(नवी दिल्ली)
देशातील फक्त ५० लोकांनी बँकांना ९२,५७० कोटी रुपयाला लुबाडले आहे. अर्थ मंत्रालयाने लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार देशातील टॉप ५० डिफॉल्टर्सनी बँकिंग व्यवस्थेची ९२,५७० कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. यामध्ये मेहुल चौक्सीची कंपनी गीतांजलीरत्न ही टॉप-५० डिफॉल्टर्सच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे.
६७०० कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी सीबीआयने मेहुल चौक्सी विरोधात तीन नवीन एफआयआर नोंदवले आहेत. पंजाब नॅशनल बँकेच्या तक्रारीवरून सीबीआयने फरारी हिरे व्यापारी मेहुल चौक्सी आणि दोन ज्वेलरी ब्रँड्सविरुद्ध हे तीन नवीन एफआयआर नोंदवले आहेत. नव्या घोटाळ्यात मेहुल चौक्सी आणि नक्षत्र ब्रँड्स लिमिटेड आणि गीतांजली जेम्स लिमिटेडचे तक्रारीत नाव असल्याचे म्हटले आहे. पीएनबी घोटाळ्यातील आरोपी चोक्सी जानेवारी 2018 मध्ये परदेशात पळून गेला होता.
७,८४८ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आलेल्या यादीत गीतांजली जेम्सचे नाव आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ एरा इन्फ्रा (रु. ५,८७९ कोटी), आरईआय अॅग्रो (रु. ४,८०३ कोटी), एबीजी शिपयार्ड (रु. ३,७०८ कोटी), विन्सम डायमंड्स (रु. २,९३१ कोटी) आणि रोटोमॅक ग्लोबल (रु. २,८९३ कोटी) यांचा क्रमांक लागतो. बँकांनी १०.१ लाख कोटी रुपयांची कर्जे माफ केली आहेत. म्हणजेच हा पैसा बँकांकडे परत येण्याची शक्यता नाही. भारतातील सर्वात मोठी बँक एसबीआयने सर्वाधिक २ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले आहे.
बँकांनी सोडले इतक्या रकमेवर पाणी
एसबीआय – 2 लाख कोटी रुपये
पंजाब नॅशनल बँक -. 67,214 कोटी
आयसीआयसीआय -. 50,514 कोटी
एचडीएफसी -. 34,782 कोटी