(संगमेश्वर / प्रतिनिधी)
गीतेचे वाचन भगवत भक्त म्हणजे अर्जुन होऊन करावे, अर्था पेक्षा ज्ञान घ्यावे. पारायणापेक्षा मनन, चिंतन करावे. रोज एकतरी ओवी वाचावी असे संत म्हणतात. मनुष्याने फक्त लक्ष देवून आणि नियमाने भगवत गीतेचे श्रवण किंवा अध्ययन करण्याची नितांत गरज आहे. कारण भगवत गीता हे सर्व ग्रंथांचे सार आहे. गीतेतील श्रेयश म्हणजे आपल्या आयुष्याचे कल्याण! व प्रेयश म्हणजे आवडीने मिळवलेला आनंद! पण आयुष्यातील कल्याण हे खरोखरच जीवनात सार्थकी लागते. पण प्रेयश नुसार आवडीने आकर्षित स्वरुपात मिळणारा आनंद हा फक्त यशाकडे नेणारा नसून विनाशाकडे नेणारा असतो.
तुमची आवड ही चांगली की वाईट हे आपण ठरवत नसून केवळ आवडीने मिळणारा आनंद उपभोगत आपण असताना आयुष्याचे कल्याण होणे महत्त्वाचे असते. म्हणून प्रेयश पेक्षा श्रेयस जतन करा. अशा स्वरूपाचे मार्गदर्शन करताना रांगव तालुका संगमेश्वर येथे नाना सरमोकादम यांच्या निवासी भागवत सप्ताहात वेदमूर्ती अनंत शास्त्री मुळ्ये भागवत कथासार यांनी दि. १ ऑगस्ट ते ७ऑगस्ट २०२३ मध्ये अभ्यासपूर्ण उपस्थितांना सुरेल आवाजात उलगडून सांगण्याचा आटोकाट प्रयत्न करून उपस्थित असणाऱ्या रसिक , प्रेक्षक व भक्त मंडळींना अगदी मंत्रमुग्ध केले.
त्याच बरोबर उल्लेखनिय लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे वेदमूर्ती मुळ्ये शास्त्रीजींना तबला साथ करणारे, व हार्मोनियम साथ करणारे शास्त्रीजींच्या समवेत आलेले रवी वय वर्षे२८ तसेच कृष्णा वय वर्षे २४ या दोन्ही व्यक्ती जन्मापासून शंभर टक्के अंध असून वेदमूर्ती मुळे शास्त्रीने त्यांना संपूर्ण आधार देऊन या वाद्य कलेमध्ये त्यांना पारंगत केले आहे. या दोन्ही व्यक्तींनी अंध असून वाद्याची कला जोपासून महाराष्ट्र राज्यात नावलौकिक मिळवला आहे. असे वाटते की प्रत्येकाने आयुष्यात करिअर करावे. पण सर्व सोयी, सर्व अवयवांनी संपन्न असूनही, तसेच शिक्षण घेण्याची कुटुंबात परिस्थिती असताना सुद्धा अनेकांना अनेकदा करिअर म्हणजे काय? हे अशा व्यंगावर मात करून आयुष्यात समृद्ध जीवन जगणाऱ्या अंध व्यक्तींकडून घ्यायला हरकत नाही. सलाम त्या रवी कृष्णाला!
नाना सरमोकादम यांच्या कडे सुमारे साडेतीनशे वर्षापासून गोपाळ कृष्ण जूने देवस्थान परंपरा असून उत्सव साजरे होत असतात. व त्यानिमित्ताने भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून ७ ऑगस्ट पर्यंत हा सप्ताह चालू राहणार आहे. पावसाळ्याचे दिवस असून सुद्धा या सप्ताह उत्सवाचे नियोजन व व्यवस्था अगदी काटेकोरपणाने केल्याचे दिसून आले.