(मुंबई)
भारतीय महिला संघातील सर्वोत्कृष्ट महिला फलंदाजांपैकी एक असलेली स्मृती मानधनाने प्रेमाविषयी एक खुलासा केला आहे.
स्मृतीचा जन्म १८ जुलै १९९६ रोजी मुंबईत झाला. तिच्या आईचे नाव स्मिता मंधाना आणि वडीलाचे नाव श्रीनिवास मंधाना आहे. तिचे वडील, माजी जिल्हा खेळाडू होते. त्यांना त्यांची मुले श्रावण आणि स्मृती यांच्याद्वारे त्यांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पुर्ण होताना पाहण्याची इच्छा होती. ती दोन वर्षांची असताना तिचे कुटुंब सांगलीला रहायला गेले. तिच्या भावाला महाराष्ट्र राज्य १६ वर्षांखालील स्पर्धेत खेळताना पाहून तिला क्रिकेट घेण्याची प्रेरणा मिळाली. वयाच्या ९ व्या वर्षी तिची महाराष्ट्राच्या १५ वर्षांखालील संघात निवड झाली होती.
स्मृतीचा भारतासह परदेशातही अफाट चाहता वर्ग आहे. स्मृतीला आयसीसीचा क्रिकेटर ऑफ दि इयर हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. 2023 मध्ये स्मृतीला क्रिकेट विश्वात 10 वर्ष पूर्ण होतील. अशातच तीने तिच्या क्रिकेट विषयी आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगताना मोठा खुलासा केला आहे.
एका वृत्तसंस्थेला मुलाखत देताना स्मृतीने तिच्या प्रेमाबद्दल खुलासा केला. ती म्हणाली, “माझ “बॅटिंग”वर प्रेम खूप आहे. मी त्याच्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. रात्री २ वाजता देखील उठू शकते”. हे करताना मला झोप देखील प्रिय असल्याचे तिने सांगितले. तसेच मी कुठेही कोणत्याही ठिकाणी निवांत झोपू शकते असे म्हटले आहे.