रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या ठेव वृद्धी मसाला आज दणक्यात प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी ८१ ठेवीदारांनी १ कोटी १० लाखांच्या ठेवी संस्थेच्या विविध शाखांमध्ये गुंतवलेल्या. संस्थेच्या सतरा ही शाखांमध्ये ठेवीदारांनी भरगोस गुंतवणूक करत उत्सवी ठेवृद्धी मासाची दणक्यात सुरुवात केली.
स्वामी स्वरूपानंद पतसंस्था प्रतिवर्षी २० जून २३ जुलै हा ठेव वृद्धि मास म्हणून साजरा करत असते. संस्थेच्या उत्तम आर्थिक स्थितीच्या पार्श्वभूमीवर ठेवीदारांना उत्तम आणि सुरक्षित गुंतवणुकीची संधी स्वरूपानंद पतसंस्था सातत्याने उपलब्ध करत आली आहे. संस्थेच्या विश्वासार्ह, शिस्तबद्ध कार्यपद्धतीमुळे मोठ्या प्रमाणावर ठेवीदार संस्थेच्या विविध ठेव योजनांमध्ये गुंतवणूक करत असतात. कोरोना च्या पार्श्वभूमीवर यावर्षीच्या ठेव वृद्धि मसाला कशा पद्धतीने प्रतिसाद प्राप्त होतो हे पाहणे औचित्याचे त्याचे होते. ठेवीदारांनी पहिल्याच दिवशी ठेवींचा भरगोस वर्षाव करत करत संस्थेच्या बाबत ठेवीदारांच्या मनात असलेला विश्वास व्यक्त केला आहे .संस्थेने गुंतवणुकीसाठी केलेल्या आवाहनाला ठेवीदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन सुरुवात केली आहे.
ठेवीदारांचा हा प्रतिसाद पाहता संस्थेने नियोजित केलेले उद्दिष्ट सहजपणे साध्य केले जाईल असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष अँड. दीपक पटवर्धन यांनी व्यक्त करताना अधिकाअधिक ठेवीदारांनी स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या विश्वासार्ह ठेव योजनांमध्ये गुंतवणूक करून संस्थेच्या अर्थ विश्वात सहभागी होऊन सुरक्षित गुंतवणुकीच्या सातत्यपूर्ण व्यवहारांचे लाभार्थी व्हावे असे आवाहन केले आहे.