(संगलट-खेड / इक्बाल जमादार )
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा दापोली मार्फत तालुक्यातील जि.प.शाळेतील शिष्यवृत्ती सारख्या विविध परीक्षेत प्राविण्य मिळवलेल्या ६४ विद्यार्थी, २ आदर्श शाळा,१ आदर्श शिक्षक, तसेच २१ सेवा निवृत्त शिक्षक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी असा सुमारे ८८ गुणवंत विद्यार्थी आणि शिक्षक यांचा दापोली तालुकाध्यक्ष दिलीप मोहिते यांचे अध्यक्षतेत,राज्य नेते उदय शिंदे, राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष दिपक शिंदे, अंकुश गोफणे राज्य सदस्य, बळीराम मोरे कोकण अध्यक्ष, दिलीप महाडिक संचालक पतपेढी, सुनिल दळवी जिल्हा सरचिटणीस, कोषाध्यक्ष अरविंद जाधव, विजय पंडित सल्लागार, विलास जाधव पतपेढी अध्यक्ष, रुपेश जाधव जिल्हा कार्याध्यक्ष,आदि. मान्यवरांचे हस्ते सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र, पुष्पगुच्छ देऊन गौरव करणेत आला.
यावेळी प्रास्ताविकात तालुका सचिव स्वप्नील परकाळे यांनी, स्वत:वर विश्वास ठेवा यश तुमचेच आहे. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही मिळवलेले यश, हे अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत मिळवलेले अतुलनिय असे यश आहे, तू हुशार आहेस,तू नक्कीच मोठा होऊ शकतोस ही एक प्रेरणा माणसाला माणूस म्हणून जगण्यास समर्थ करीत असते. गुणवंत,आदर्श हे फक्त शब्द नसून हा एक सन्मान आहे. आणि हा सन्मान महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा दापोलीच्या वतीने होत असून आज आपण या सर्व गुणवंतांचा सन्मान करीत असल्याचे सांगितले. तर अनेक वर्षानंतर दिमाखदारपणे कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल दापोली शाखेला दिलीप महाडिक यांनी सलाम केला,
गत शैक्षणिक वर्षात यश खेचून आणलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी हा कार्यक्रम असल्याचे महाडिक यांनी सांगत पाच सप्टेंबर रोजी सामुहिक रजा घेऊन आंदोलन मोहिमेत सहभागी व्हा असे आवाहन ही केले.यानंतर राज्य सदस्य अंकुश गोफणे यांनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे मानसशास्त्र विचारात घेता,इतर कामे वगळणेबाबत प्रशासनाने विचार केला पाहिजे.
शिक्षण चळवळीचा दिपस्तंभ असलेले शिक्षक हितासाठी झटत असलेले राज्यनेते, शिक्षकांना आधारस्तंभ वाटणारे उदय शिंदे होय असे अंकुश गोफणे यांनी मनोगत व्यक्त केले.संघटनात्मक काम व्यक्त करण्यासाठी मिळालेली एक संधी असते ती म्हणजे संघटना. जेव्हा अन्याय होतो, तेव्हा धावून येते ती संघटना. संघटनेसाठी झोकून दिले पाहिजे. घातलेल्या हाकेला सर्वांनी साथ द्या, समाजासाठी शिक्षक आणि शिक्षक संघटना यांचे योगदान नेहमीच अनमोल असते. अशैक्षणिक कामावर कायम बहिष्कार असणार आहे.गुणवत्तेसाठी आम्ही बांधील आहोत.काही गोष्टीना विरोध करायला शिका असे आवाहन गोफणे यांनी यावेळी केले. जग जिंकण्यासाठी आत्मविश्वासाची गरज असल्याचेही त्यांनी पुढे सांगितले.तर राज्य नेते उदय शिंदे यांना दापोली शाखेमार्फत मानपत्र,स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करणेत आले. दिलेल्या मानपत्राचे वाचन कोषाध्यक्ष अर्जुन कांबळे यांनी केले. यावेळी जिल्ह्यासह, राज्यभरातून असंख्य शिक्षक व संघटनेचे सदस्य उपस्थित होते.
राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांनी, एवढा दिमाखदार कार्यक्रम आयोजीत केल्याबद्दल तालुका शाखेचे अभिनंदन करत गुणवंत विद्यार्थी तुम्ही भावी आधारस्तंभ आहात, भविष्यात ध्येय नजरेसमोर ठेवून मार्गक्रमण करा. आईवडील आणि गुरुजनांच्या मार्गदर्शनात,स्वत:ला ओळखून गुणवंत विद्यार्थी बना आणि आदर्श नागरिक बना, हे सांगत उपस्थित ग्रामस्थ आणि शिक्षकांना पाच सप्टेबर रोजी बहिष्कार कार्यक्रम हा फक्त शिक्षकांसाठी नसून समाजासाठी आहे. भविष्यात सरकारी शाळा कशा टिकतील यासाठी हा बहिष्कार असून, शासनाचे खाजगीकरणाचे धोरण दिसत आहे, गोरगरिब मुलांसांठी मिळणारे शिक्षण बंद होऊ शकते. भविष्यात शासकिय शिक्षण संपुष्टात आणण्याचे काम सुरु असल्याचे दिसत आहे. शिक्षकांना शिकवू न देता, अशैक्षणिक इतर कामांसाठी जुंपले जाते. यासाठी हा बहिष्कार असल्याचे कोरगावकर यांनी सांगितले.
यावेळी अंकुश गोफणे यांना राज्य ऑडिटर म्हणून नियुक्तीपत्र देण्यात आले. सगळे मिळून चांगल्याचे कौतुक करता तर वाईटाच्या वाटेला भिडता आले पाहिजे, भविष्यात शास्त्रज्ञ तयार करण्याचे काम आपल्या शिक्षण विभागातून स्पर्धा परीक्षांची पायाभरणी ही जि.प. शाळांमधून दिसून येते. विद्यार्थ्यांना खर्या अर्थाने तन, मन, धन अर्पूण चांगली संधी देत आहात,त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन, शिक्षकांना चांगले काम करतांना प्रोत्साहन देणे गरजेचे असते आणि हे काम शिक्षक समितीकडून होत असल्याबद्दल आनंद आहे. विद्यार्थी हे माझे दैवत आहे,आणि त्याची यथा योग्य पूजा करुन त्या दैवतासाठी झटणारे आपण कोकण विभागातील सर्व शिक्षक सेवा करीत आहात. याबद्दल आपणास अभिमान असल्याचे उदय शिंदे यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले. तसेच ज्या आनंदात आपण आता पर्यंत सेवा केली आहे, तिला तोड नाही.
शिक्षण क्षेत्रासारखे आनंददायी क्षेत्र नाही.दर्जेदार आणि गुणवत्ता प्रधान शिक्षण कसे मिळेल यासाठी सेवानिवृत्तांनी यापुढेही ही समाजात काम करावे, गावागावात शैक्षणिक कट्टा निर्माण करुन फक्त शेक्षणिक विकासासाठी प्रयत्न केल्यास उद्याचा भारत बलशाली करण्यासाठी आपलं योगदान लाभाव असेही उदय शिंदे यांनी सांगितले. तर चळवळीत काम करतांना विशिष्ट हेतूने करु नका,माझ्यामुळे चळवळ अहे असे समजू नका, चळवळीस वेठीस धरुन कुणी काम करु नका,जेव्हा लोकं अपल्यावर विश्वास ठेवतात,त्या विश्वासाला पात्र राहून कार्य करा, संघटनेची चळवळ ही घोडदौड ठरावी,दापोलीकरांनी जिल्हा आणि राज्याची मने जिंकलीत, तसेच रत्नागिरी वासियांनी whats app संदेशावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन. हा निर्णय राज्यभर कसा जाईल यासाठी राज्य नेतृत्वानेही प्रयत्न केला पाहिजे. आंदोलन कुणी सुरु केलं यापेक्षा त्या आंदोलनाला पाठिंबा देणं हे आपलं काम चोखपणे बजावले पाहिजे,तरच चळवळ यशस्वी होईल. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांनी प्रामाणिक पणे काम करावे,असे सांगून त्यांनी सर्वांना मनापासून धन्यवाद दिले.
शेवटी तालुकाध्यक्ष मोहिते यांनी तालुक्यापासून राज्यनेतृत्वाने सहकार्य केले म्हणून कार्यक्रम यशस्वी झाल्याचे सांगितले. यावेळी अखिल जिल्हाध्यक्ष प्रविण काटकर, उर्दू जिल्हाध्यक्ष मुश्ताक तांबे तसेच खेड, चिपळूणहून आलेले महायुतीचे उमेदवार मनोज म्हस्के, शरद भोसले, दापोलीचे अशोक मळेकर तसेच सर्व संघटनांचे पदाधिकारी, उपस्थित होते.संपूर्ण सोहळ्याचे सुत्रसंचालन, विजय क्षिरसागर,मधुकर शिंदे यांनी केले.तर सोहळा यशस्वी करणेसाठी शिक्षक समितीच्या सर्व शिलेदारांनी मेहनत घेतली.