खेड तालुक्यातील वावे तर्फे नातू या गावचे रहिवासी प्राथमिक शिक्षक श्री.शरद भिकू शिंदे(दादा) हे शनिवार दि.३०/०४/२०२२ रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले आहेत. जि.प.प्रा.शाळा वावे तर्फे नातू वाळंज ता.खेड या शाळेत त्यांनी दि.२० जून २००८ ते दि.३० एप्रिल२०२२ पर्यंत तीन वर्षे उपशिक्षक व अकरा वर्षे मुख्याध्यापक म्हणून प्रामाणिक व विनम्र सेवा केली असून, या शाळेतूनच ते सेवानिवृत्त झाले आहेत.
श्री.शरद शिंदे हे दि.११फेब्रुवारी१९९३ रोजी जि. प.प्रा.शाळा काजुर्ली नं.३, ता.गुहागर या शाळेत रुजू झाले. या शाळेत त्यांनी दि.११फेब्रुवारी१९९३ते ७ जून १९९५ पर्यंत सेवा केली. त्यानंतर आपल्या खेड तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा खवटी धनगर या शाळेत दि.८जून १९९५ ते १४ जून १९९६ पर्यंत सेवा केली. तेथून एका वर्षातच त्यांची बदली जि.प.पू.प्रा.केंद्रशाळा नातूनगर नं.१,ता.खेड येथे दि.१५ जून १९९६ ला झाली. या शाळेत त्यांनी १२वर्षे सेवा केली व त्यानंतर आपल्या गावी जि.प.प्रा.शाळा वावे तर्फे नातू वाळंज,ता.खेड या शाळेवर ते दि.२० जून २००८ रोजी रुजू झाले. व या शाळेतूनच ते दि.३० एप्रिल २०२२ रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. आपल्या २९ वर्षे २ महिने च्या कार्यकाळात त्यांनी एकूण चार शाळांमध्ये प्रामाणिक व विनम्र सेवा बजावली आहे.
श्री.शरद शिंदे (दादा) यांचे शैक्षणिक क्षेत्राबरोबर सामाजिक क्षेत्रातही फार मोठे योगदान आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा खेडचे ते कार्याध्यक्ष आहेत. शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रातही ठसा उमटविणारे प्राथमिक शिक्षक श्री.शरद शिंदे(दादा) यांना सेवानिवृत्ती नंतरच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यासाठी सर्व क्षेत्रातील मान्यवर,सर्व शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, मित्र परिवार, ग्रामस्थ व नातेवाईक बहुसंख्येने उपस्थित होते.