(राजापूर / तुषार पाचलकर)
प्राथमिक शिक्षक समिती, पदवीधर शिक्षक संघटना, केंद्रप्रमुख सभा, अखिल भारतीय शिक्षक संघ, उर्दू शिक्षक संघटना, शिक्षक सेना यांचे गटबंधनातून तयार झालेल्या महायुती पॅनलच्या विरोधात उर्वरित संघटना, गटतट एकत्र येऊन महापरिवर्तन पॅनल तयार झाले आणि या दुहेरी लढतीत गेली पाच वर्ष चांगले काम करूनही महायुती पॅनलला अपेक्षित यश मिळाले नाही, यामुळे सर्वत्र आश्यर्य व्यक्त केलं जातं आहे.
रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या रत्नागिरी 2023 -2028 साठी नुकत्याच झालेल्या,संचालक मंडळाच्या अटीतटीच्या निवडणुकीत महायुती पॅनलला राजापूर तालुक्यात 5 तर महापरिवर्तन पॅनल ला 4 सीट मिळाल्या, परंतू जिल्ह्याच्या राखीव जागंपैकी 2 सीट जादा मिळाल्यामुळे महायुतीला 7जागा तर महापरिवर्तन 9 जागा यामुळे महापरिवर्तन पॅनल बहुमताने सत्तेत आले.
यावर्षीचे लागलेले निकाल पाहता कुठल्याच तालुक्यात कुठल्याही एका पॅनल ला पूर्ण यश संपादन करता आलं नाही.मात्र राजापूर तालुक्याने महायुतीने 100%यश प्राप्त करत आपली विजयी परंपरा कायम राखली. त्यामुळे आलेल्या निकालाबाबत बोलायचं झाले तर थोडी ख़ुशी थोडी गम असंच बोलावं लागेल.
राजापूर, लांजा, सांगमेश्वर, चिपळूण व दापोली हे महायुतीच्या ताब्यात तर रत्नागिरी, गुहागर, खेड व मंडणगड हे तालुके महपरिवर्तनच्या ताब्यात राहिले.महायुतीच्या विजयात पाचल विभागाने मोठे योगदान दिले.त्यामुळे राजापूरला तालुका व जिल्हा प्रत्येकी एक असे दुहेरी यश मिळाले. यामुळे दोन्ही उमेदवाराने विजय मिळाल्यानंतर प्रथम राजापूर तालुक्यात सर्वात मोठी बाजारपेठ व सर्वात जास्त शिक्षक मतदार वर्गअसलेल्या पाचल विभागाचा दौरा केला. महायुती पॅनल मध्ये विजयी झालेल्या उमेदवरांचा स्वागत व सत्कार सोहळा समारंभ नुकताच पाचल येथील कुणबी पतपेढी हॉल मध्ये सम्पन्न झाला. समारंभाच्या अगोदर पाचल येथील बाजारपेठेतील जवळेथर फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत पायी जात विजयी मिरवणूक काढण्यात आली व
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून राजापूर तालुक्याचा महायुती पॅनल चा विजय साजरा करण्यात आला.
यावेळी राज्याच्या सल्लागार विजयकुमार पंडित, शिक्षक बँकेचे अध्यक्ष विलास जाधव, जिल्हा उपाध्यक्ष अनाजी मासये, जिल्हा प्रतिनिधि सुभाष सरदेसाई, तालुका उपाध्यक्ष संतोष चव्हाण, कार्याध्यक्ष सत्यवान कुवळेकर, माजी उपाध्यक्ष संदीप भिंगार्डे, सुधाकर जाधव, शिक्षक सेना सरचिटणीस रवींद्र रसाळ, dcps जिल्हाध्यक्ष विश्वनाथ डवरी, माजी शिक्षक प्रवीण जाधव, जयेश तेलंग, राणे गुरुजी व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तालुकाचे विजयी उमेदवार विजय बाळू खांडेकर, व जिल्हा महिला उमेदवार प्रांजली दीपक धामापूरकर यांनी उपस्थित मान्यवरांचे तसेच निवडणुकीत सहकार्य करण्याऱ्या सर्वांचे आभार मानले.