(संगमेश्वर / प्रतिनिधी )
सातारा येथील जिल्हा परिषदच्या पटांगणात ५ ते ८ जानेवारी दरम्यान भरलेल्या पुस्तक महोत्सवाला वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळाला . आज पुस्तक महोत्सवात कोकणच्या संगमेश्वरचे लेखक जे . डी . पराडकर आणि मुंबई येथील आशिष निनगूरकर यांच्या चपराक प्रकाशित अग्निदिव्य यां दोन पुस्तकाचे प्रकाशन प्रमुख पाहुणे साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य प्रदीप पाटील, सागर महाराज पवार, सुप्रसिद्ध साहित्यिक आणि वक्ते, प्राचार्य यशवंत पाटणे, पुस्तक सातारा महोत्सवाचे सयोजक आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाहो शि्रीष चिटणीस ,कथाकार राजेंद्र माने, साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाह विकास मेहेंदळे, लेखक जे . डी . पराडकर , आशिष निनगुरकर चपराकचे संपादक घनश्याम पाटील , अरुण कमळापूरकर , आदि मान्यवर उपस्थित होते .
ज्या व्यक्तिमत्वानी आदर्श जीवनाची व्याख्या आपल्या वार्तानातून आणि कार्यप्रणालीतून शिकवली अशा व्यक्तींचे चित्रण म्हणजे प्राजक्ताचे सडे हे पुस्तक होय. प्राजक्ताचे फुल ज्याप्रमाणे दुसऱ्याला गंध देवून स्वतः आपल्या देठाच्या रंगाप्रमाणे विरक्त रहाते, तशी या पुस्तकातील व्यक्तिमत्व असल्याने पुस्तकाला प्राजक्ताचे सडे हे अनुरूप असे नाव दिले आहे. या पुस्तकाचे मुखपृष्ठ हेमंत सावंत यांनी केले आहे. प्राजक्ताचे सडे हे जे. डी. पराडकर यांचे सातवे पुस्तक असून पुणे येथील चपराक प्रकाशनने प्रकाशित केलेले सलग सहावे पुस्तक आहे.
कोकणचे लेखक जे . डी . पराडकर आणि मुंबईचे लेखक आशिष निनगूरकर या दोघांच्या लेखनात मोठी ताकद आहे . त्यांनी केलेले वर्णन डोळ्यासमोर उभे रहाते . चपराकने प्राजक्ताचे सडे हे त्यांचे प्रकाशित केलेले सहावे पुस्तक आहे . आज सातारा पुस्तक महोत्सवात प्राजक्ताचे सडे आणि अग्निदिव्य या दोन पुस्तकांचे प्रकाशन झाले , ही चपराकसाठी आनंदाची बाब आहे . प्रकाशनाच्या पहिल्याच दिवशी पुस्तकाला वाचकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्याने ही पुस्तके नक्कीच विक्रम करेतील .
घनश्याम पाटील
संपादक , चपराक प्रकाशन पुणे
पुस्तक मागविण्यासाठी संपर्क ७०५७२९२०९२