(रत्नागिरी / प्रतिनिधी)
गेल्या तीन वर्षापासून शिवाजीनगर रत्नागिरी येथे कार्यरत असणाऱ्या प्राईम डायग्नाॅस्टिक्सच्या वतीने सर्वांच्या शारीरिक आरोग्यासोबत सामाजिक भान जपत वेगवेगळे समाजोपयोगी उपक्रम साजरे केले जातात. या सामाजिक बांधिलकीतून 14 नोव्हेंबर 2022 रोजी रत्नागिरी येथील निरीक्षणगृह बालगृह येथील मुलांसोबत बालचमुला वेगवेगळ्या उपयुक्त अशा भेटवस्तू देऊन बालदिन साजरा करण्यात आला.
यावेळी बालसंकुल गृहाचे कार्याध्यक्ष सुधाकरराव सावंत, उपकार्याध्यक्ष श्री. प्रकाश शिंदे, सहसचिव श्री. राजेंद्र पटवर्धन, आणि प्राईम डायग्नाॅस्टिक्सच्या डायरेक्टर डॉ तरन्नुम खलिफे मॅडम व प्राईम डायग्नाॅस्टिक्सचे सर्व सदस्य, बाल संकुल गृहातील सर्व मुले व इतर मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते.