(संगलट / प्रतिनिधी)
रौप्यमहोत्सवी वाटचाल करीत असलेल्या महाराष्ट्र जर्नालिस्ट फौंडेशन या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या एनजीओचे वतीने प्रतिवर्षी आयोजित करण्यात येत असलेल्या १९व्या राज्यस्तरीय दि प्राईड ऑफ महाराष्ट्र गौरव सभारंभ सन २०२३ चे महाड जि. रायगड येथे आयोजन करण्यात आले होते. या संस्थेच्या वतीने देण्यात येणारा सन २०२३ साठीचा महाराष्ट्र राज्य आदर्श पत्रकार पुरस्कार खेडचे दै. रत्नागिरी टाइम्सचे पत्रकार अधिस्विकृती समिती सदस्य श्री. दिलीप देवळेकर यांना संस्था अध्यक्ष राजीव लोहार संपादिका सौ.मनिषा राजीव लोहार, डॉ. नंदकुमार तासगावकर, डॉ. राजेंद्र सरकाळे, नितीन पावले शिवसेना प्रवक्ते रायगड जिल्हा, प्रशांत गुजर (उद्योजक महाड) सौ.निता सुभाष शेठ सामाजिक कार्यकर्ता महाड यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
यावेळी पत्रकार व कोकण अधिस्विकृती सदस्य श्री. दिलीप देवळेकर यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. सामाजिक, राज्यस्तरीय त्यांना अनेक पुरस्कार मिळाले असून त्यांच्या यशाबददल खेडसह संपूर्ण कोकणात अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. गेली अनेक वर्षे पत्रकारीता करित असलेल्या देवेळेकर यांच्या सामाजिक कार्याची दखल घेवून त्यांना सदर पुरस्कार सन्मानपूर्वक देण्यात आला. जवळपास शंभरहून अधिक पुरस्कार प्राप्त करणारे ते महाराष्ट्रातील पत्रकार आहेत.
फोटो – महाराष्ट्र आदर्श पत्रकार पुरस्काराने दिलीप देवळेकर यांना गौरविताना संस्थापक अध्यक्ष श्री. राजीव लोहार, डॉ. राजेंद्र सरकाळे, डॉ. नंदकुमार तासगावकर, योगेश पाटील संपादीका सौ.मनिषा राजीव लोहार