(मुंबई)
प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोणची तब्येत अचानक बिघडली असून तिला मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दीपिकाला अस्वस्थ वाटू लागले होते तसेच श्वास घेण्यास त्रास होत असल्याने तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या तिची तब्येत बरी असल्याचे सांगण्यात येत आहे.
जवळपास एक महिन्यापूर्वी दीपिकाची तब्येत अचानक बिघडली होती. त्यावेळी तिचे हैदराबादमध्ये चित्रपट ’प्रोजेक्ट के’ याचे शूटिंग सुरू होते. त्यावेळी दीपिकाच्या हृदयाचे ठोके वाढले होते. त्यावेळी तिला हैदराबादमधील कामिनेनी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे तिच्यावर एक दिवस उपचार करण्यात आले होते.
दीपिकाची तब्येत जेव्हा हैदराबादमध्ये खराब झाली होती त्यावेळी चित्रपटाच्या निर्मात्याने म्हटले होते की, हे तिचे रूटीन चेकअप आहे. तसेच कोविड -१९ आजारापासून काही दिवसापूर्वीच बरी झाली होती.