(चिपळूण / ओंकार रेळेकर)
सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या चिपळूणमधील प्रशांत यादव मित्र मंडळातर्फे विनामूल्य अस्थिरुग्ण उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक २ आणि ३ सप्टेंबर रोजी सकाळी ८.३० ते दुपारी १ आणि दुपारी २ ते सायंकाळी ६ अशा दोन सत्रात शहरातील बहादुरशेख नाका येथील ‘सहकार भवन’ येथे हे शिबिर होईल.
या शिबिरा मध्ये गुडघेदुखी, कंबरदुखी, पाठदुखी, आणि हाता पायाला मुंग्या येणे यावर मोफत उपचार केले जाणार आहेत. शिबिरासाठी जोधपूर येथील सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. नंदकिशोर पाराशर यांच्या समवेत डॉ. हेमंत पाराशर, डॉ. जगदीश पाराशर आणि डॉ. सुरज भान हे तज्ञ डॉक्टर रुग्णांची तपासणी करणार आहेत.
या शिबिरात सहभागी होण्यासाठी रुग्णांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी इच्छुकांनी सकाळी 9 ते सायंकाळी 6 यावेळेत 9422405048, 9890393823 या क्रमांकावर नोंदणी करायची आहे. दिनांक 30 ऑगस्ट पर्यंत नोंदणी करणे आवश्यक असून ज्यांनी नोंदणी केली आहे त्यांना तपासणी साठी प्राधान्य दिले जाणार आहे. या शिबिराचा बहुसंख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.