(चिपळूण)
पंतप्रधानानी गरीब शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री कृषि सन्मान निधी योजना देशातील कमी उत्पन्नाच्या शेतकऱ्यांना लागू केली आहे. या योजनेमध्ये जे ग्रामीण भागातील लाभार्थी आहेत त्यांना तालुका पातळीवर हेलपाटे मारावे लागत आहेत. सुरुवातीला या योजनेचा लाभ बन्यापैकी शेतकऱ्यांना मिळत होता, पण गेल्या वर्षभरात ज्या राष्ट्रीयीकृत बँकेत शेतकन्यांची खाती उघडलेली आहेत त्या खात्यात आता पैसेच जमा होताना दिसत नाहीत.
संबंधित लाभार्थीनी चौकशी केली असता त्यांचा लाभ दुसऱ्याच कोणत्यातरी बँकेत जमा होताना दिसतो. याबाबत तालुका कृषि अधिकारी म्हणतात की, लाभार्थीच्या खाते क्रमांकाचा कोड नंबर आमच्याकडे उपलब्ध होत नाही. तुम्ही तहसिलदार कार्यालयाकडे संपर्क साधा. वरील योजनेचे प्रत्येक लाभार्थ्याच्या खात्यात वर्षाला सहा हजार रुपये शासनाने जमा करावयाचे आहेत. काही लाभार्थ्याच्या खात्यात वर्षभरात एकही रुपया जमा झालेला नाही, त्यामुळे ग्रामीण भागातील गरीब शेतकन्यांना वरील योजनेचा लाभ मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे,असे मुकादम म्हणाले. संबंधित अधिकाऱ्याकडे चौकशी केली असता काही लाभार्थ्याचे पैसे खात्यात जमा होत नसल्याचे अधिकाऱ्यांनी मान्य केले आहे.
तालुक्यातील बहुसंख्य ग्रामपंचायती कार्यालयात संगणक उपलब्ध आहेत. तरी या योजनेच्या संबंधित अधिकारी म्हणजे तहसिलदार,गटविकास अधिकारी घ तालुका कृषी अधिकारी यांनी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये संबंधित अधिकान्यांना पाठवून लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकन्यांना मार्गदर्शन करून लाभाथ्र्यांना लाभ मिळवून द्यावा. वरील योजनेमध्ये हजारों गरीब शेतकरी लाभार्थी आहेत, त्यांना हेलपाटे मारायला लावू नका. या योजनेची तातडीने दखल न घेतल्यास संबंधित अधिकान्याना जाब विचारण्यासाठी आम्हाला रस्ख्यावर उतरावे लागेल, असे मुकादम यांनी म्हटले आहे.