(इक्बाल जमादार/खेड)
कुणीही मुलभूत सुविधांपासून वंचित राहता कामा नये. प्रत्येकाला रस्ता , पाणी , वीज , शिक्षण निवारा, अन्न मिळालेच पाहीजे. लोकप्रतिनिधी म्हणून त्यासाठी प्रयत्न करणे हे माझे कर्तव्य आहे. तांडावस्ती योजना ही धनगर बांधवाच्या सर्वागीण विकासासाठीची योजना आहे . परंतू या योजनेच्या निकष व अटी जाचक असून त्यामुळे माझ्या कोकणातील धनगरबांधव या योजनेच्या लाभापासून वंचित आहे . त्यामुळे तांडावस्तीची लोकसंख्येची अट शिथील होणे गरजेचे आहे. यासाठी माझा लढा सुरु आहे . त्यामध्ये मी नक्कीच यशस्वी होईन याचा मला विश्वास आहे . आपण सर्वजण शिवसेनेवर , शिवसेना प्रमुखांवर जे प्रेम करता त्याबद्दल मी आपला आभारी आहे. असेच प्रेम यापुढेही राहू द्या. मी आपल्या विकासासाठी कटीबध्द आहे . असे प्रतिपादन शिवसेना आमदार योगेशदादा कदम यांनी किंजळे तर्फे खेड धनगरवाडी रस्त्याच्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी केले.
पिंपरी चिंचवडचा बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक राहूल ढेबे व त्याचा सहकाऱ्यांच्या पाठपुराव्यामुळे हे काम सुरु झाले त्यांना गावातील तसेच मुंबई पुण्याचा ग्रामस्थांनी सहकार्य केले. शाखाप्रमुख अरुण मोरे व विकास संस्थेच्या चेअरमन रेखा चव्हाण यांनी या रस्त्यासाठी विशेष प्रयत्न केले . पि.डी. गोरे , गणपत मोरे , कॅप्टन आखाडे व संघटनेचे पदाधिकारी या रस्त्याच्या कामासाठी आग्रही होते. यावेळी मोठयासंख्येने मुंबई पुणेकर बांधव आले होते . किंजळे ग्रामस्थ तसेच पंचक्रोशातील संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते. ग्रामस्थांनी आमदारांचा सत्कार केला. यावेळी रेखा चव्हाण व दर्शना मोरे यांची विकास संस्थेच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच माजी बांधकाम व आरोग्य समिती सभापती अरुण ऊर्फ आण्णा कदम माजी जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण , सचिन धाडवे , विश्वास कदम , प्रकाश मोहिते , शेखर यादव , विठ्ठल ढेबे , लक्ष्मण ढेबे , नारायण ढेबे , सुनिल ढेबे , सिताराम ढेबे , विनोद ढेबे , महादेव ढेबे , रमण ढेबे इत्यादी मान्यवर उपस्थित होते .