(नवी दिल्ली)
चालू आर्थिक वर्षात १० फेब्रुवारीपर्यंत मागील वर्षाच्या तुलनेत एकूण प्रत्यक्ष करसंकलन २४ टक्क्यांनी वाढून १५.६७ लाख कोटी रुपये झाले आहे. अर्थ मंत्रालयाने सांगितले की, करदात्यांना परतावा दिल्यानंतर निव्वळ प्रत्यक्ष करसंकलन १२.९८ लाख कोटी रुपये आहे. त्यामध्ये १८.४० टक्के वाढ झाली असून ती सुधारित अंदाजाच्या ७९ टक्के आहे. चालू आर्थिक वर्षाचा सुधारित अंदाज १६.५० लाख कोटी रुपये होता, तर अर्थसंकल्पीय अंदाज १४.२० लाख कोटी रुपये होता.
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) माहिती दिली की २०२१-२२मधील १४.०८ लाख कोटी रुपयांच्या तुलनेत २०२२- २३ मध्ये प्रत्यक्ष कर महसूल १७ टक्क्यांनी वाढला आहे. एप्रिल २०२२ ते १० फेब्रुवारी २०२३ पर्यंत कॉर्पोरेट आयकर (सीआयटी) आणि वैयक्तिक आयकर (पीआयटी) संकलनात अनुक्रमे १९.३३ टक्के आणि २९.६३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. परताव्यानंतर सीआयटी १५.८४ टक्के आणि पीआयटी २१.२३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. या कालावधीत करदात्यांना एकूण २.६९ लाख कोटी रुपये परत करण्यात आल्याचे सीबीडीटीने म्हटले आहे. हे एक वर्षापूर्वीच्या तुलनेत ६१.५८ टक्के अधिक
इंडिया पोस्टने केवळ दोन दिवसांत देशभरातील एक लाख पोस्ट ऑफिसमध्ये सुकन्या समृद्धी योजनेची १०.९० लाख नवीन खाती उघडली आहेत. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवांतर्गत विभागाने ७.५ लाख नवीन खात्यांचे उद्दिष्ट ठेवले होते.