(मुंबई)
प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाच्या थडग्याजवळ असलेली अतिक्रमणे हटवल्यानंतर राज्य सरकारने आणखी एक मोठी घोषणा केली आहे. अफजलखानाच्या कबरीजवळ खानाचा कोथळा बाहेर काढतानाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार असल्याचा निर्णय सरकारतर्फे घेण्यात आला आहे.
सातारा जिल्ह्यातील प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाच्या कबरीजवळ खानाचा कोथळा बाहेर काढत असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार असल्याची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. अफझलखाच्या वधाला यंदा ३५० वर्षे पूर्ण झाली आहेत. या पुतळ्या सोबत या ठिकाणी लाईट आणि साऊंड शो सुरू करण्यात येणार आहे. अनेक शिवप्रेमींच्या मागणीनंतर असा पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला असल्याचे राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.
शिंदे- फडणवीस सरकारने शिवप्रतापदिनाचे औचित्य साधत प्रतापगडावरील अफजलखानच्या कबरीसमोरील अतिक्रमण काढले होते. त्यानंतर छत्रपती संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक करत राज्यातील अन्य गड-किल्ल्यांवरील अतिक्रमणेही हटवण्याची मागणी केली होती. गडाच्या पायथ्याची अतिक्रमणे हटवल्यानंतरआता राज्य सरकारने त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारणार असल्याची घोषणा केली असल्याने शिवप्रेमींनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
शिवभक्तांच्या मागणीला लक्षात घेऊन, किल्ले प्रतापगड परिसरात छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्यावर चाल करुन आलेल्या अफजल खानाचा कोथळा काढतानाचा पुतळा आणि लाईट व साउंड शो सुरु करण्यासाठी तात्काळ प्रस्ताव मागविण्यात आला आहे!#shivpratap #छत्रपतीशिवाजीमहाराज #प्रतापगड pic.twitter.com/SyR0v23av3
— Mangal Prabhat Lodha (Modi Ka Parivar) (@MPLodha) November 15, 2022