( संगलट-खेड / इक्बाल जमादार )
मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक अनिल चांदणे हे ३६ वर्षाच्या पदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले आहेत. पोलीस उपनिरीक्षक अनिल चांदणे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त कशेडी पोलीस मदत केंद्राच्यावतीने कशेडी बंगला येथे रविवार रोजी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
पोलीस उपनिरीक्षक श्री अनिल चांदणे हे मूळचे खेड तालुक्यातील बोरज गावचे रहिवासी असून १९८७ साली रत्नागिरी येथे पोलीस कॉन्स्टेबल पदावर पोलीस दलात सेवेत रुजू झाले. त्यांनी रत्नागिरी मुख्यालय, चिपळूण, अलोरे शिरगाव, देवरुख, दापोली, खेड, पोलादपूर पोलीस ठाणे व कशेडी महामार्ग पोलीस मदत केंद्र येथे प्रामाणिक सेवा बजावली आहे. सन २०२० साली त्यांची पोलीस उपनिरीक्षक पदावर बढती झाली. आपल्या सेवाकाळात त्यांनी तनमन धनाने प्रामाणिकपणे सेवा करताना जनतेत मिसळून पोलीस हा जनतेचा मित्र आहे असे दाखवून दिले आहे. त्यांचा नम्र स्वभाव सहकाऱ्यांशी प्रेमाने वागणूक हे त्यांचे गुणवैशिष्ट्य होते.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज म्हसकर, पीएसआय धुमास्कर, महाडचे पीएसआय श्री जाधव, श्री पवार, सेवानिवृत्त पीएसआय श्री शेलार, सहाय्यक फौजदार यशवंत बोडकर, सह. फौज. सुर्वे, पो. ह. कुंभार, साखरकर, पवार, दुर्गावळे, चिपळूण महामार्ग व कशेडी महामार्ग पोलीस कर्मचारी अधिकारी व कशेडी बंगला ग्रामस्थ उपस्थित होते.