(मुंबई)
महाराष्ट्र पोलिस दलातील अधिका-यांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला गेला आहे. गृह विभागाकडून पोलिस अधिका-यांच्या गणवेश भत्त्यात वाढ करण्यासंदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्र पोलिस दलात कार्यरत अधिका-यांच्या गणवेश भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. गृहविभागाने पोलिस अधिका-यांचा भत्ता १ हजार रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पोलिस अधिका-यांना आता वार्षिक गणवेश भत्ता सहा हजार रुपये मिळणार आहे. राज्य पोलिस दलातील पोलिस उपनिरीक्षक ते अपर पोलिस अधीक्षक या अधिका-यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.
पोलिस अधिका-यांना यापूर्वी ५ हजार रुपयांचा गणवेश भत्ता दिला जात होता. गणवेश भत्ता वाढवण्यात यावा, अशी मागणी देखील होत होती. अखेर गृहविभागाने पोलिस अधिका-यांच्या गणवेश भत्त्यात १ हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिस उपनिरीक्षक ते अपर पोलिस अधीक्षक या अधिका-यांना लाभ मिळणार आहे. सुरुवातीच्या दिवसात गणवेश भत्ता देण्याऐवजी गणवेशाचे साहित्य पोलिस कर्मचा-यांना दिले जायचे. २०२१ मध्ये साहित्य देणे बंद करून त्याऐवजी रक्कम पोलिसांना देण्याचा निर्णय गृहविभागाने घेतला होता. त्यामुळे आता रोखीने ही रक्कम मिळणार आहे.