अश्लिल आणि कामूक सामग्री प्रसारीत करणाऱ्या वेबसाईट्सना आपल्या नोंदणीकृत सदस्यांच्या वय पडताळणीसाठी कठोर उपाययोजना कराव्या लागणार आहेत. ज्यामध्ये क्रेडिट कार्ड तपासणी आणि फोटो आयडी निश्चिती (लिंक) करणे. तसेच, वापरकर्त्याचे वय 18 वर्षांपेक्षा अधिक आहे, याची खात्री करणे, अशा काही बाबींचा आणि त्याच्या कडक अंमलबजावणीचा समावेश आहे. ही सर्व उपाययोजना ऑनलाइन सुरक्षा कायद्याचा भाग आहेत. नियामक ऑफकॉम प्लॅटफॉर्मसाठी मसुदा मार्गदर्शन जारी करत आहे. मुलांना सुस्पष्ट सामग्रीमध्ये प्रवेश करण्यापासून कसे सुरक्षित करावे आणि नवीन इंटरनेट कायद्यांचे पालन कसे करावे, याबातब कठोर भूमिका घेतली जात आहे.
ऑफकॉमचे मसुदा मार्गदर्शन फोटो आयडी जुळणी (लिंक) वापरण्यासह अनेक शिफारशींची रूपरेषा देते. ज्याची तुलना पासपोर्ट सारख्या अपलोड केलेली कागदपत्रे आणि रिअल-टाइम इमेजशी केली जाते. वयाची तपासणी करण्यासाठी प्रस्तावित पद्धती तांत्रिकदृष्ट्या अचूक, मजबूत, विश्वासार्ह आणि न्याय्य असणे आवश्यक आहे. 18 वर्षांखालील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वापरकर्त्यांसाठी वय-प्रतिबंधित वेबसाइट आपोआप अवरोधित करेल. कमी वयाच्या वापरकर्त्यास अशा प्रकारची सामग्री उलब्धच होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल. जे चेहरे सत्यापित होतील त्यांचे वय तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आणि मोबाईल नेटवर्क वय पडताळीद्वारे केली जाईल, असेही ऑफकॉमने आपल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे.
अश्लिल आण कामूक कंटेंट पाहण्यासाठी वापरकर्त्यांकडे डिजिटल आयडेंटिटी वॉलेटसाठी साइन अप करण्याचा पर्याय असू शकतो. ज्यामध्ये वयाचा पुरावा डिजिटल पद्धतीने संग्रहित केला जाऊ शकतो. ज्यामुळे वयाची पडताळणी झाल्यावर ऑनलाइन पोर्नोग्राफी सेवांसह सुरक्षितपणे शेअर केले जाऊ शकते.
ऑफकॉम स्पष्टपणे सांगते की, अनेकदा असे आढळून येते की, अनेक वापरकर्ते वयाची माहिती देत नाहीत. तसेच, अनेक साईट्सचे सभासदत्व घेण्यासाठी ऑनलाईन पेमेंट (उदा. डेबिट कार्ड) पद्धती वापरली जाते. ज्यामध्ये वयाची पुष्टी केली जात नाही. तसेच, अटीही अगदीच सामान्य असतात. अस्वीकरण किंवा सामग्रीबद्दल चेतावणीही दिली जात नाही. त्यामुळे ऑनलाइन सुरक्षा कायद्यांतर्गत, या नियमांचे पालन करण्यात अयशस्वी ठरलेल्या प्लॅटफॉर्मवर कारवाई केली जाऊ शकते. त्यांना संभाव्य दंडासह अंमलबजावणी कारवाईला सामोरे जावे लागू शकते. ऑफकॉमच्या मुख्य कार्यकारी डेम मेलानी डावेस यांनी ऑनलाइन साईट्सवर प्रसारीत होणाऱ्या अश्लिल सामग्रीबद्दल चिंता व्यक्त करत मुलांना सहजतेने मिळणाऱ्या प्रवेशांवर आक्षेप घेत हा प्रवेश थांबविण्यासाठी कडक पावले टाकण्यावर अधिक जोर दिला.
ऑफकॉम ऑनलाइन पोर्नोग्राफी सेवांसोबत सहयोग करण्याची योजना आखत आहे. मुलांचे अयोग्य (अश्लिल, हानिकारक) सामग्रीपासून संरक्षण करणे आणि कायदेशीर सामग्री ऑनलाइन ऍक्सेस करणार्या प्रौढांसाठी गोपनीयता अधिकार आणि स्वातंत्र्य यांचे रक्षण करणे यामधील समतोल राखणे हे यामागचे उद्दिष्ट आहे.