रत्नागिरी : वाढत्या पेट्रोल, डीझेल, गॅस आणि जीवनावश्यक वस्तूंच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्य माणूस हैराण झाला आहे. जनतेसमोर जगावं कि मरावं असा प्रश्न आहे.याच वाढत्या महागाई विरोधात रत्नागिरी युवक आणि तालुका विध्यार्थी काँग्रेसने प्रदेश राष्ट्रवादीच्या आदेशानुसार कोविड-19 चे नियम पाळून आंदोलन केले.
मोदी सरकारचा निषेध करत जिल्हाधिकारी कार्यालयात जावून निवासी जिल्हाधिकारी श्री. दत्ता भडकवाड यांना निवेदन दिले.
त्याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सचिव श्री बंटी सदानंद वणजू, युवक जिल्हा उपाध्यक्ष श्री पप्पु तोडणकर राष्ट्रवादी विध्यार्थी तालुकाध्यक्ष कु सुरज शेट्ये, राष्ट्रवादी विध्यार्थी जिल्हा उपाध्यक्ष संकेत कदम, विध्यार्थी तालुका चिटणीस प्रथमेश कांबळे, सौरभ वांगणकर, भुषण पवार,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राजेश केळकर, अक्षय मजगावकर आणि राष्ट्रवादी युवक, विध्यार्थी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.