(मुंबई)
गेल्या काही दिवसांपासून भारतीय संघाबाहेर असणा-या पृथ्वी शॉ ने रणजी सामन्यात धुवांधार फलंदाजी केली आहे. पृथ्वीने २८ चौकारांच्या मदतीने द्वशतकी खेळी केली. पृथ्वी शॉच्या तुफानी फलंदाजीपुढे प्रतिस्पर्धी संघातील फलंदाज दुबळे व कुचकामी ठरले होते. द्विशतकी खेळी करत पृथ्वी शॉ ने आपल्या धुवाधार खेळाने भारतीय निवड समितीचे लक्ष वेधले आहे.
मुंबई आणि आसाम यांच्यात रणजी क्रिकेट स्पर्धेत सामना सुरु आहे. या सामन्यात पृथ्वी शॉने आसामच्या गोलंदाजांना धुवून काढले. पृथ्वी शॉने २३५ चेंडूचा सामना करताना द्विशतकी खेळी केली. या खेळीदरम्यान पृथ्वीने २८ चौकार आणि एक षटकार लगावला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा पृथ्वी शर्मा २४० धावांवर नाबाद होता. यादरम्यान पृथ्वीने प्रथम श्रेणी क्रिकेट कारकिर्दीतील सर्वोत्तम धावसंख्याही पार केली आहे. याआधी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याची सर्वोत्तम धावसंख्या २०२ होती, जी त्याने पार केली आहे.
पृथ्वी शॉने मुशीर खानसोबत १२३ धावांची सलामी दिली. त्यानंतर अजिंक्य रहाणेसोबत तिस-या विकेटसाठी नाबाद २०० धावांची भागिदारी केली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा मुंबईच्या दोन बाद ३९७ धावा झाल्या होत्या. पृथ्वी शॉने फिरकिपटू रोशन आलम याच्या गोलंदाजीवर धावांचा पाऊस पाडला. रोशन आलम याच्या ७६ चेंडूवर ७६ धावा वसूल केल्या. यंदाच्या रणजी हंगामातील पृथ्वीचे पहिलेच शतक होय. रणजी स्पर्धेतील पृथ्वीची हा सर्वोत्कृष्ट धावसंख्या आहे. मागील सात डावात पृथ्वीच्या फक्त १६० धावा होत्या, पण या सामन्यात पृथ्वीने दमदार फलंदाजी केली.