(रत्नागिरी)
मागील पाच महिन्याहून अधिक कालावधीत सुरू असलेला एसटी कर्मचार्यांच्या संपाचा तिढा अखेर बुधवारी सुटला आहे. रत्नागिरीतील कर्मचार्यांनी संपातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जिल्ह्यातील पूर्वीच्या नियोजित वेळापत्रकानुसार 100 टक्के फेर्या लवकरच सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करावे, यामागणीसाठी कर्मचार्यांनी दिवाळीपासून संप पुकारला होता. या संपात रत्नागिरी विभागातील तीन हजारहून अधिक कर्मचारी सहभागी झाले होते. दरम्यानच्या कालावधी यातील 1 हजार कर्मचारी कामावर हजर झाले. आता न्यायालयाने विलीनीकरण होणार नसल्याचे स्पष्ट करून पगारवाढ देण्यात येईल. त्यामुळे कोणतीही न कारवाई करता हजर करून घ्या, असे सांगितले आहे. त्यामुळे रत्नागिरीतील कर्मचार्यांनी संपातून माघार घेतली आहे.
सध्या 996 कर्मचारी कामावर हजर आहेत. 2 हजार 236 कर्मचारी संपात सहभागी आहेत. लवकरच 1 हजाराहून अधिक कर्मचारी हजर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.