जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे एक मोठी घटना घडली आहे. पुलवामा येथील गंगू भागात दहशतवाद्यांनी पोलीस आणि सीआरपीएफ जवानांवर हल्ला केला. या हल्ल्यात सीआरपीएफचा एक जवान जखमी झाला आहे. हल्ल्यानंतर परिसराची नाकाबंदी करण्यात आली आहे.
या भागात दहशतवादी असल्याच्या माहितीवरून पोलीस आणि सीआरपीएफचे जवान गंगू भागातील ब्लॉकवर तपासणी मोहीम राबवत होते. या तपासणीदरम्यान काही दहशतवादी तेथून निघाले होते. चेकिंगमध्ये पकडले जाण्याच्या भीतीने त्यांनी पोलिस आणि सीआरपीएफ जवानांवर हल्ला केला. या हल्ल्यात एक एएसआय शहीद झाला आहे.