(देवरूख)
सध्या संपूर्ण कोकणात शिमगा सण मोठ्या उत्साहात सुरु आहे. सगळ्या गावात ग्रामदैवत पालख्या घरोघरी भक्तांच्या भेटीला जात आहे.अशाच प्रकारे संगमेश्वर तालुक्यातील पुर्ये गावात सुद्धा अशाच उत्साहाच्या वातावरणांत सण सुरू आहे.मात्र या ठिकाणीं चर्चा सुरू आहे ती स्टायलिश गोमू नाचाची.
तसेच ही पूर्वापार परपंरा आहे, ती आम्ही जपत आहोत व कायमच अशी जपत राहणार असा विश्वास गावकर गोरुले यांनी व्यक्त केला. यावेळी गावकर रवी गोरुले, तानाजी गोरूले, बाळू गोरुले यांनी यावेळी माहिती दिली. त्यामुळे हा स्टायलिश गोमू नाच परिसरात चर्चेचा विषय बनत आहे. अनेकजण या गोमू सोबत फोटो काढत, नाच करत आनंद लुटत आहेत.