(राजापूर)
महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या रत्नागिरी जिल्हा शाखेची नुतन कार्यकरणी राज्याध्यक्ष प्रसाद पाटील यांच्या उपस्थितीत जाहीर झाली असून सर्वानुमते जिल्हाध्यक्षपदी यशवंत पेढांबकर, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल कुटेकर तर राज्य कार्याध्यक्षपदी (हंगामी) प्रकाश पाध्ये यांची निवड करण्यात आली आहे. चिपळूण येथे झालेल्या संघटनेच्या जिल्हा कार्यकारणीच्या विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे राज्य प्रमुख सल्लागार विनायक घटे होते.
यावेळी बोलताना राज्याध्यक्ष प्रसाद पाटील म्हणाले संघटना सोडण्याचे काहीही कारण नसताना काही जिल्हा पदाधिकारी इतर संघटनेत गेल्याने पूर्वीची रत्नागिरी जिल्हा कार्यकारणी बरखास्त करण्यात आली असून आजच्या विशेष सभेत निवडण्यात आलेली नुतन कार्यकारणी ही यापुढे अधिकृतरित्या संघटनेचे कामकाज पाहील. तसेच पुरोगामी विचाराचा वारसा जपणारी पुरोगामी शिक्षक संघटना शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर राहिली असून भविष्यातही शिक्षकांचे जिल्हा व राज्य पातळीवरील प्रश्न सोडवण्यासाठी कटीबद्ध राहील, असा विश्वास दिला.
अध्यक्षपदावरून बोलताना विनायक घटे म्हणाले, प्रलोभनाला बळी पडून संघटना सोडलेल्या लोकांनी जो संघटनेचा विश्वासघात केला आहे तो योग्य नाही. आम्ही ज्यांना मोठं केलं त्यांच्याकडूनच हे अनुभवायला मिळाल हे दुर्दैव आहे. पण संघटनेचा पाया मजबूत असल्याने कोणीही खचून न जाता जोमाने कार्य सुरू ठेवावे. आपल्या कार्याच्या व विचाराच्या जोरावर एका वर्षातच रत्नागिरी जिल्ह्यात नंबर एकची संघटना म्हणून पुरोगामीचे नाव पुन्हा घेतले जाईल असा ठाम विश्वास व्यक्त केला व नुतन जिल्हा पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी सुरेश साळवी, प्रदीप पवार यांनीही पुरोगामी संघटनेबाबतचे धोरण आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
रत्नागिरी जिल्हा शाखा नुतन कार्यकारणी –
राज्य कार्याध्यक्ष (हंगामी) – प्रकाश पाध्ये (राजापूर), जिल्हा नेते – प्रदीप पवार (चिपळूण), जिल्हाध्यक्ष – यशवंत पेढांबकर (चिपळूण), जिल्हा सरचिटणीस – विठ्ठल कुटेकर (दापोली), जिल्हा कोषाध्यक्ष – महेश मोरे (गुहागर), जिल्हा प्रमुख संघटक – चंद्रशेखर कोतवडेकर (चिपळूण), जिल्हा प्रमुख सल्लागार – सुरेश साळवी (राजापूर), जिल्हा सल्लागार – यशवंत पाडावे (लांजा), महिला प्रमुख सल्लागार – पूजा विरकर (चिपळूण), महिला जिल्हा संघटक – तेजल पेढांबकर (चिपळूण), श्वेता सकपाळ(खेड), जिल्हा उपाध्यक्ष – विनोद घडशी (खेड), रविंद्र चव्हाण (गुहागर), पांडूरंग डाकरे (खेड)
तालुका अध्यक्ष –
दापोली – विठ्ठल कुटेकर (प्रभारी), खेड – विनोद घडशी (प्रभारी), चिपळूण – शशिकांत सपकाळ, गुहागर – महेश मोरे (प्रभारी), लांजा – नितीन कोलते, राजापूर – रंगराव चौगुले
यावेळी सर्व नुतन पदाधिका-यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. सभेस जिल्हातील पुरोगामी शिलेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक प्रकाश पाध्ये यांनी केले. आभार चंद्रशेखर कोतवडेकर यांनी मानले तर सूत्रसंचालन शशिकांत सपकाळ यांनी केले.
सभेस महिला राज्य सरचिटणीस शारदा वाडकर , राज्य सचिव रंगराव वाडकर, राज्य संघटक पी. आर. पाटील, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष एस.के. पाटील, कोल्हापूर जिल्हा नेते गोविंद पाटील, माजी महिला राज्य सरचिटणीस पूजा वीरकर व रत्नागिरी जिल्ह्यातील पुरोगामी शिलेदार उपस्थित होते.