(नवी दिल्ली)
भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करणा-या सहा महिला कुस्तीपटूंपैकी चार महिलांनी त्यांच्या आरोपांच्या समर्थनार्थ ऑडिओ आणि व्हिज्युअल पुरावे दिले असून सदर पुरावे आरोप सिद्ध होण्यासाठी पुरसे नसल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी हा दावा केला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिल्ली पोलिसांच्या एका अधिका-याने पहिल्या घटनेचा हवाला देत दावा केला की दोन्ही तक्रारकर्त्यांनी ब्रृजभूषण यांच्यावरील आरोपांना समर्थन करतील असे पुरेसे पुरावे दिले नाहीत. पोलिसांनी सांगितले की, आम्ही तक्रारदारांना कथित घटनांच्या सर्व तारखा आणि वेळा देण्यास सांगितले होते. त्यांला त्यांच्या रूममेट्स आणि परदेशातील स्पर्धेदरम्यान कथित लैंगिक अत्याचार झालेल्या हॉटेल्सची माहिती देण्यासही सांगण्यात आले.
एसआयटीने या प्रकरणांमध्ये आरोपींना समन्स बजावले होते आणि त्यांना त्यांच्यावरील आरोपांना विरोध करणारे सर्व पुरावे प्रदान करण्यास सांगितले होते. त्यांनी आपल्या बचावात काही कागदपत्रे आणि व्हिज्युअल देखील दिले आहेत. या प्रकरणात एसआयटीने आतापर्यंत २०० हून अधिक लोकांची चौकशी करून त्यांचे जबाब नोंदवले आहेत.