( रत्नागिरी / प्रतिनिधी )
गेल्या काही दिवसात रत्नागिरी तालुक्यात दोन अपहरणाच्या धक्कादायक घटना घडल्या. यामध्ये पहिली घटना रत्नागिरी येथील एका हायस्कूलमधून दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या. आणि दुसरी घटना १५ वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण झाल्याचे समोर आले होते. अशा दोन एका पाठोपाठ एक धक्कादायक घटना घडल्या. या दोन्ही अपहरण गुन्ह्यांतील कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, उपविभागीय अधिकारी सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करून अपहरण झालेल्या मुलांची शोध मोहीम सुरू करण्यात आली होती. मात्र यामध्ये विशेष कामगिरी विलास जाधव यांनी पार पाडली आहे.
पोलिसांच्या तांत्रिक तपासात दोन मुली नागालँड राज्याची राजधानी कोहिमा येथे असल्याचे समजताच तातडीने विलास जाधव यांच्यासह इतर पोलिसांचे पथक नागालँडला रवाना झाले. रत्नागिरी ते नागालँडच्या कोहीमा भागात पोहचून दोन मुलींना आपल्या ताब्यात घेऊन विमानाने वेगाने प्रवास करत सुरक्षीत रत्नागिरी येथे आणले. या उत्तम कामगिरीबद्दल पुन्हा एकदा पोलीस अधीक्षक डॉ मोहित कुमार गर्ग यांनी कर्तव्यदक्ष पोलीस विलास जाधव यांच्या तत्परतेबद्दल कौतुक केले आहे.