(रत्नागिरी)
पुण्यातील सेइनुमेरो निर्माण प्रा. लि. कंपनीने आज नाचणे आयटीआय येथे भरती मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यातून पात्र ५० उमेदवारांच्या मुलाखती घेऊन आणि कागदपत्रांची छाननी करून त्यांना थेट नोकरीचे पत्र दिले आहे. पुण्यामध्ये या कंपनीचे दोन प्लांट असून ऑटोमोबाईल क्षेत्रातील ही कंपनी आहे. रत्नागिरीत प्रथमच मुलाखत, भरती मेळावा आयोजित करून कंपनीने येथील उमेदवारांना रोजगार दिला आहे.
सेइनुमेरो निर्माण प्रा. लि. कंपनी गट नं. २०७, प्लॉट नं. ६, ७ व ८, शिंदेवाडी, (ता. भोर, जि. पुणे) येथे आहे. या कंपनीमध्ये मशिन ऑपरेटर या पदासाठी या पदासाठी भरती केली. याकरिता आयटीआय ट्रेडमधील टर्नर, फिटर, मशिनिस्ट, मशिनिस्ट ग्राइंडर, मिलर, ड्रिलर, मॅकेनिकल, मशिन टूल्स मेंटेनन्स, डिप्लोमा मॅकेनिकल आदी शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार मुलाखतीसाठी आले होते. या भरती मेळाव्याला चांगला प्रतिसाद लाभला.
भरती मेळाव्याचे उद्घाटन माजी आमदार व सिंधुरत्न योजनेचे सदस्य प्रमोद जठार व रत्नागिरी जिल्हा बेरोजगार व स्वयंरोजगार सहकारी संघाचे संचालक राजू भाटलेकर, आयटीआयचे प्राचार्य एस. जी. कोतवडेकर, महाव्यवस्थापक राजीव पाध्ये, भाजपा नेते राजीव कीर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. याप्रसंगी रत्नागिरी औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथील बीटीआरआय अधिकारी नीलेश मद्रे, सेइनुमेरो कंपनीचे अधिकारी श्रीशैल मैंदरगीकर, सोमनाथ गोरड, खेमचंद्र बोबडे, शेखर डिमळे, विकास काळे, संतोष चव्हाण आदी उपस्थित होते. या अधिकाऱ्यांनी उमेदवारांची कागदपत्रे, प्रमाणपत्रे पाहून आणि मुलाखती घेऊन निवड केली. त्यांना पत्र देण्यात आले. दिवसभर ही प्रक्रिया सुरू होती.
फोटो : सेइनुमेरो निर्माण प्रा. लि. कंपनीने आयटीआय येथे आयोजित भरती मेळाव्यात ५० पात्र उमेदवारांना नोकरीचे पत्र देण्यात आले. यातील एका उमेदवाराला पत्र देताना कंपनीचे महाव्यवस्थाक (वित्त) राजीव पाध्ये