(मुंबई)
मध्य रेल्वेच्यावतीने उन्हाळी सुट्यांच्या निमित्त विविध मार्गांवर उन्हाळी विशेष रेल्वे सुरू करण्यात आल्या आहेत. पुण्याहून कोकणात जाणाऱ्यांची संख्या लक्षात घेता, पुणे ते रत्नागिरी दरम्यान देखील उन्हाळी विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासानाने घेतला आहे. ४ मे ते २५ मे दरम्यान पुणे ते रत्नागिरी दरम्यान दर गुरूवारी आणि ६ मे ते २७ मे दरम्यान रत्नागिरी ते पुणे दर शनिवारी धावणार आहे.
रल्वे नं. ०११३१ – पुणे ते रत्नागिरी रेल्वे ४ ते २५ मे या कालावधीत दर गुरूवारी रात्री ८ वाजून ५० मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी सकाळी साडेसातच्या सुमारास ती रत्नागिरीला पोहोचेल. तर रेल्वे नं. ०११३२ – रत्नागिरी ते पुणे रेल्वे ६ ते २७ मे या कालावधीत दर शनिवारी दुपारी १ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री बाराच्या सुमारास पुणे स्थानकावर पोहोचेल.
ही रेल्वे लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड या रेल्वे स्थानकांवर थांबेल.