(देवरूख / सुरेश सप्रे)
पी.एस. बने इंटरनॅशनल स्कूल साडवली येथे सोमवार 14 नोव्हेंबर रोजी बाल दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला चिपळूण संगमेश्वर चे आमदार शेखर निकम, रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व पी. एस. बने इंटरनॅशनल स्कूलचे संचालक रोहन बने, विवेक शेरे, आरजीसी बँकेचे संचालक राजू सुर्वे, उद्योजक सुरेश उर्फ बारक्याशेठ बने, प्राचार्य, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
बाल दिनाचे औचित्य साधून पी. एस. बने इंटरनॅशनल स्कूल मध्ये फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी विविध संदेश देणारे ड्रेस परिधान केले होते. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या कला कौशल्याला वाव देण्यासाठी ड्रॉइंग आणि कलरिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी विविध संदेश देणारे ड्रॉइंग काढून या स्पर्धेमध्ये उत्साह निर्माण केला.
परिश्रमातूनच यश प्राप्त करता येते आणि परिश्रम ही यशाची गुरुकिल्ली आहे, हे कायम लक्षात ठेवून वाटचाल करावी असे प्रतिपादन आम. शेखर निकम यांनी करून विद्यार्थ्यांना बाल दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. यासंबंधीचे विचार त्यांनी व्यक्त केले. रोहन बने यांनी बाल दिनाचे महत्व, बालदिन का साजरा केला जातो यासंबंधीचे आपले विचार व्यक्त केले.