(मुंबई)
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या पदव्यूत्तर जागांसाठी प्रवेश घेऊन उच्छिणा-या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. या प्रवेशासाठी कट-ऑफ गुण कमी करण्यास केंद्राने हिरवा कंदिल दाखविला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सर्व श्रेणींच्या कट ऑफ मार्क्समध्ये २५ टक्के कपात केली जाणार आहे.
पीजी वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी कट ऑफ कमी करण्यास केंद्राने मान्यता दिली आहे. गेल्या शैक्षणिक सत्रात झालेल्या पीजी समुपदेशनात मोठ्या संख्येने जागा रिक्त झाल्या होत्या. त्यामुळे सर्व श्रेणींमधील कट-ऑफ गुणांमध्ये २५ टक्के कपात होणार आहे.
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या शिफारशींच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे. आयोगाने तशी शिफारस केंद्राकडे केली होती. सर्व श्रेण्यांमध्ये कट-ऑफ गुण कमी केल्यास सामान्य श्रेणीतील उमेदवारांसाठी सुधारित पात्रता कटऑफ २५ टक्के राहिल.