(नवी दिल्ली)
देशभरात काही दिवसापूर्वी पॉप्युलर फ्रंट इंडियाच्या कार्यालयांवर कारवाई करण्यात आली. काही संशयित लोकांना ताब्यातही घेण्यात आले आहे. या कारवाईनंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. पीएफआयच्या निशाण्यावर संघ मुख्यालय आणि भाजपचे जेष्ठ नेते असल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र एटीएसच्या तपासादरम्यान ही धक्कादायक माहिती दिली आहे.
मागील आठवड्यात तपास यंत्रणांनी पीएफआयशी संबधित ठिकाणी छापेमारी केली होती. पीएफआयच्या अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना ताब्यात घेण्यात आले होते. यामध्ये १०० पेक्षा जास्त लोकांना ताब्यात घेण्यात आले होते. महाराष्ट्र एटीएसने चौकशी केली यादरम्यान धक्कादायक माहिती समोर येत आहे. दरम्यान एटीएसच्या रडारवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते तसेच भाजपचे नेतेही होते.
तसेच पीएफआयकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर मुख्यालयाची सर्व माहितीही गोळा करण्यात आली होती. दुस-या दिवशी आरएसएसच्या कार्यालयात कार्यक्रम होतो याबाबत सर्व माहिती गोळा केली होती. याबाबतची सर्व माहिती आणि तपास पुढे सुरू आहे. त्याचबरोबर अटक करण्यात आलेल्यांना न्यायालयासमोर सादर केले जाणार आहे. या कारवाईनंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.