(रत्नागिरी)
तालुक्यातील पावस खारवीवाडा येथील ४४ वर्षीय प्रौढाने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. चिंतामणी भिवा डोर्लेकर असे त्याचे नाव असून, ही घटना शुक्रवारी (२१ जुलै रोजी) मध्यरात्री २ ते ३ वाजण्याच्या दरम्यान घडली. ते मानसिक रुग्ण असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेची माहिती संतोष काशिनाथ डोर्लेकर (वय ३८) यांनी पूर्णगड सागरी पोलिस स्थानकाला दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
चिंतामणी भिवा डोर्लेकर हा मनोरुग्ण असून, त्यांच्यावर रत्नागिरीतील खासगी रुग्णालयात औषधोपचार सुरू होते. त्याने मानसिक रुग्णावस्थेतच राहत्या घरी गळफास लावून घेत आत्महत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. या घटनेचा तपास पोलिस अंमलदार एस. व्ही. चव्हाण करत आहेत.