(रत्नागिरी)
पावस तालुक्यातील गोळप-नवेदरवाडी येथील वाहून बेपत्ता झालेल्या प्रौढाचा मृतदेह रोहिदासवाडी वहाळात सापडला. रवींद्र कृष्णा भाटकर असे मृत प्रौढाचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. २६) रात्री सव्वानऊच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी रवींद्र यांचे भाऊ राजेंद्र कृष्णा भाटकर यांनी माहिती दिली होती.
रवींद्र भाटकर हे नाचणे रोड मारुती मंदिर येथील युनिटी बँकेत काम करत होते. बुधवारी रात्री घरी परतत असताना गोळप रोहिदासवाडी ते नवेदरवाडी येथील वहाळामधून जात असताना वाहून बेपत्ता झाले होते. गुरूवारी (ता. २७) सकाळी सव्वादहाच्या सुमारास वहाळाच्या पात्रात आढळला. या घटनेचा पोलिसांकडून पंचनामा करण्यात आला आहे. पूर्णगड पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद झाली.