(गावखडी/वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील पावस एज्युकेशन सोसायटीचे विविध कला-कौशल्य केंद्र यांचे सहकार्याने फिनोलेक्स, मुकुल -माधव फौंडेशन यांच्या सौज्यन्याने युवा परिवर्तन कोर्स चे इलेक्ट्रिशियन, मल्टीस्किल (प्लंबिंग, इलेक्टीशियन, पेटिंग) या तीन महिन्याचे सटिफिकेट कोसचे उदघाटन श्री. जावेद काझी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी अध्यक्षीय भाषणात श्री. लाईक फोंडू यांनी फिनोलेक्स कंपनीला धन्यवाद देऊन मुकुल-माधव फौंडेशन युवा परिवर्तन कोर्समुळे पावस परिसरातील युवांच्या हाती काम मिळेल याबाबत समाधान व्यक्त केले. कंपनीने आजपर्यंत परिसरातील युवांचा प्रामुख्याने विचार करून त्यांना रोजगाराची संधी दिली आहे. अशाच प्रकारे कंपनीने यापुढे युवांच्या हाती काम दयावे, ही प्रामुख्याने आमची मागणी असेल असे प्रतिपादन यावेळी केले.
यावेळी उपस्थित श्री मन्सुर काझी, श्री शफी काझी, अक्रम नाखवा, एल-सी.डी.मॅनेजर वनिश्का मुरकर, वायरमन टेनर शवैकत मजगांवकर, मल्टीस्किल टेनर भिकाजी नाटेकर उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत लाईक फोंडू यांनी केले.
फोटो: मटर पावस एज्युकेशन सोसायटीचे विविध कला-कौशल्य केंद्र फिनोलेक्स मुकुल-माधव फौंडेशन युवा परिवर्तन कोर्सचे उदघाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना श्री लाईक फोंडू, जावेद काझी, मन्सुर काझी, शफी काझी, अक्रम नाखवा अन्य मान्यवर उपस्थित होते
फोटो सौजन्य : दिनेश पेटकर, गावखडी