(आरोग्य)
पावसाळ्या ओलाव्यामुळे जीवाणू झपाट्याने वाढतात. यामुळे, यूटीआय म्हणजेच मूत्रमार्गात संसर्ग होण्याचा धोका वाढतो. पुरुषांपेक्षा महिलांना यूटीआयचा धोका जास्त असतो. युटीआयच्या बाबतीत, लघवी करताना वेदना जाणवते, जळजळ होते, वारंवार लघवीची समस्या असते, पोटाच्या खालच्या भागात वेदना होतात. काहींना तापाची लक्षणे जाणवतात. कधी कधी काही कारणास्तव लघवीला जाणे होत नाही, जास्त काळापर्यंत लघवी रोखल्याने मूत्रमार्गात जिवाणू उद्भवतात त्यामुळे लघवीची लागण होते. ही समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे. बाहेर जाऊन काम करणाऱ्या स्त्रियांमध्ये हा त्रास वाढतो. मसालेदार पदार्थ खाणे, दूषित पाणी पिणे, गरजेपेक्षा जास्त वेळा लघवीला जाणे, किंवा लघवीला थांबवणे अश्या कारणांमुळे युरीन इन्फेक्शन होते.
मूत्रमार्गाचे संक्रमण, किंवा UTIs, हे सामान्य मूत्र संक्रमण आहेत जे मूत्रमार्गात कोठेही होऊ शकतात (ज्यामध्ये मूत्रपिंड, मूत्रमार्ग, मूत्राशय आणि मूत्रमार्ग यांचा समावेश होतो). जेव्हा यूटीआय खालच्या मूत्रमार्गात होतो, तेव्हा त्याला मूत्राशयाचा संसर्ग (सिस्टिटिस) म्हणतात आणि जेव्हा त्यात वरच्या मूत्रमार्गाचा समावेश होतो, तेव्हा त्याला मूत्रपिंडाचा संसर्ग (पायलोनेफ्रायटिस) म्हणतात. जर UTI मूत्रपिंडात पसरला तर ते गंभीर आरोग्य समस्यांना जन्म देऊ शकते.
वारंवार लघवी होणे, जास्त काळ मूत्र धरून ठेवणे आणि अस्वच्छतेमुळे युटीआय संसर्गाचा सामना करावा लागू शकतो. योनीमार्गात जास्त घाम येणे हेदेखील जंतूसंसर्ग वाढण्यास कारणीभूत ठरू शकते. यूटीआयशी निगडीत सर्वात सामान्य जीवाणू म्हणजे एशेरिचिया कोलाई हा आहे. हा जीवाणू संक्रमणास कारणीभूत आहे. कोणत्याही वयोगटातील महिलांना याचा त्रास होऊ शकतो. यूटीआय संसर्गाच्या समस्येकडे वेळीच न दिल्यास पायलोनेफ्रायटिस (मूत्रपिंडाचा दाह) किंवा सेप्सिससारखी गंभीर गुंतागूंत होऊ शकते. म्हणून, एकदा लक्षणे दिसल्यास उपचारास विलंब करू नका.
शरीर ठेवा स्वच्छ –
पावसाळ्यात शरीराच्या स्वच्छतेची विशेष काळजी घ्या. विशेषत: मासिक पाळी सुरू असेल तर पॅड जपून वापरा. ओले वाटत असल्यास लगेच पॅड बदला. रोज आंघोळ करा. स्वच्छ कपडे घाला. अंडरवियर ओली असेल तर लगेच बदला. शौचालय वापरताना स्वच्छतेची विशेष काळजी घ्या. टॉयलेट सॅनिटायझर देखील वापरू शकता.
ओले कपडे घालू नका –
पावसाळ्यात कपडे ओले झाले असतील तर ते घालू नका. यामुळे संसर्गाचा धोका वाढतो. स्वतःला शक्य तितके कोरडे ठेवण्याचा प्रयत्न करा. प्रायव्हेट पार्ट पाण्याने स्वच्छ केल्यानंतर अनेकदा तो ओला राहतो, पण अशी चूक करू नका. प्रायव्हेट पार्ट पाण्याने स्वच्छ केल्यानंतर टॉयलेट पेपरच्या मदतीने तो कोरडा करा.
जास्तीत जास्त पाणी प्या –
यूटीआय टाळण्यासाठी, जास्तीत जास्त पाण्याचे सेवन करा. पावसाळ्यात लोक पाण्याचे सेवन कमी करतात. या चुकीमुळे युटीआयच्या विळख्यात येऊ शकता. जास्त पाणी प्यायल्याने संसर्ग लवकर शरीरातून निघून जाईल. ताज्या फळांचे रस, भाज्यांचे ज्यूस, सूप घ्या. युरीन इन्फेक्शन झाल्यास चहा, कॉफी आणि चॉकलेटच्या सेवनापासून दूर राहावे.
घट्ट कपडे घालू नका –
पावसाळ्यात घट्ट कपडे टाळा. ओलावा आणि घामामुळे बॅक्टेरिया वाढू लागतात. म्हणूनच पावसाळ्यात सैल आणि सुती कपडे घाला.
इम्युनिटी वाढवा –
युटीआय टाळण्यासाठी इम्युनिटी वाढवा. इम्युनिटी वाढवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे सकस आहार घेणे. आहारात हंगामी फळे आणि भाज्यांचा समावेश करा. घरी शिजवलेले ताजे अन्न खा. पावसाळ्यात तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाणे टाळा. व्हिटॅमिन सी असलेल्या फळांचा रस घेणे योग्य ठरेल. नारंगी, मोसंबी, लिंबाचा रस घेतल्याने संसर्ग दूर होण्यास मदत होते. अननसाच्या रसाचे सेवन करावे.
यूटीआयचा उपचार अँटीबायोटिक्सने केला जातो. युरिन कल्चर चाचणीद्वारे यूटीआयचे निदान केले जाते.
मूत्रमार्गाच्या संसर्गाची लक्षणे
खालच्या मूत्रमार्गाच्या किंवा मूत्राशयाच्या संसर्गाच्या लक्षणांमध्ये हे समाविष्ट आहे:
- वारंवार मूत्रविसर्जन
- लघवी करताना वेदना किंवा जळजळ
- मूत्र रक्त
- मूत्राशय रिकामे असूनही लघवी करण्याची इच्छा होते.
- मांडीचा सांधा किंवा खालच्या ओटीपोटात, दाब किंवा क्रॅम्पिंग आहे.
वरच्या मूत्रमार्गाच्या किंवा मूत्रपिंडाच्या संसर्गाच्या लक्षणांमध्ये हे समाविष्ट आहे:
- सर्दी
- ताप
- मळमळ किंवा उलट्या
- पाठीच्या खालच्या भागात दुखणे किंवा पाठीच्या बाजूला दुखणे