(वैभव पवार / गणपतीपुळे)
रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे येथे पावसाळा हंगाम चालू झाल्याने तडी मच्छीमारीला वेग आला असून रोड ने मच्छी गरवण्यासाठी युवकांमध्ये मोठी क्रेझ निर्माण झाली आहे
याबाबत सविस्तर वृत्त असे की गणपतीपुळे गावाला विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला आहे. तसेच विस्तीर्ण अशी खाडी देखील आहे त्यामुळे पावसाळी हंगामात तडी मच्छीमारी मोठ्या प्रमाणात केली जाते पहिला पाऊस पडून गेल्यानंतर पाणी पूर्णपणे लाल होते, त्याला खांदू आलं असं म्हटलं जातं. याच खा़दूंचा फायदा घेत येथील मच्छीमार मच्छी मारण्याच्या जाळी किंवा रॉडने गणपतीपुळे समुद्रामध्ये मच्छीमारी करताना दिसून येत आहेत. या वेळेला मच्छीमारी करत असताना मोठ-मोठे मासे गरीला लागत असल्याचे दिसून येत आहे गणपतीपुळ्याच्या समुद्राबरोबरच तिवरी बंदर वरवडे भंडारपुळे या ठिकाणी असणाऱ्या खडपामध्ये मोठ्या प्रमाणात मच्छीमारी करताना दिसत आहेत.
यामध्ये मोठे बोयर मासा, गोबरा, कालाप्प तांबोशी मासे मोठ्या प्रमाणात लागत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सध्या येथील युवक रोड व साधी गरी यांच्या आधारे तासंतास मच्छीमारी करताना दिसत आहेत. त्यामुळे ऐन पावसाळ्यात मच्छी विकत घेऊन न खाता स्वतः मच्छीमारी करून उदरनिर्वाह करण्याकडे या युवकांचा कल असतो.