खंडाळा वार्ताहर
यंदा १५ मे ला पावसाचे आगमन झाले. पाऊस चांगला होईल असा अंदाज पण होता. पाऊस लवकर पडल्याने शेतकऱ्यांचे खुप नुकसान झाले. पण यावर कोणीही आवाज उठवला नाही. कोकणातील शेतकरी शांत असल्याने पुढारी पण निर्धास्त राहिले. आंब्याचा सिजन संपला आणि पावसाळी शेतीची कामे सुरु झाली. पण परत निसर्गाने पाठ फिरवली. जवळजवळ १० दिवस झाले पाऊस गायब झाला. शेतकरी राजाने शेतातील रोपे लावणी साठी काढून ठेवली होती ती मेली, भात लावणी साठी चिखल केला होता तो सुकला. आता पर जेव्हा पाऊस पडेल तेव्हा ही कामे परत शेतकऱ्यांला करायला लागणार आहेत. सर्व शेतकऱ्यांची नजर आभाळाकडे लागली आहेत.