(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शेतीत जिल्हयासाठी भूषणावह प्रयोग पावस गोळप – नवेदरवाडी येथील शेतकर्याने केला आहे. या प्रयोगशील शेतकर्याचं नाव आहे हरिचंद्र गोरिवले. त्यांनी 3 गुंठयामध्ये काळ्या भाताची लागवड तर केलीच शिवाय मसूर, मूगाच्याही शेतीचा प्रयोग त्यांनी केला आहे. 3 गुंठयात काळया भाताचे त्यांनी 160 किलो उत्पादन घेतले. त्यांच्या या प्रयोगाने शेतकरी वर्गाला प्रेरणा मिळणार आहे.
गोरिवले हे दरवर्षी 40 गुंठयांमध्ये भात लागवड करतात. या 40 गुंठयात लाल भात, कोमल, रत्नागिरी अशा 3 प्रकारच्या वाणाची शेती करतात. लाल भात लागवड केल्यानंतर 110 दिवसानंतर कोपणी करण्यात येेते. यावर्षी त्यांनी प्रथमच मूग आणि मसूर या शेतीचा प्रयोग केला आहे. त्याची पेरणीही झाली आहे.
गोरिवले म्हणाले की, लाल भाता भाताच्या वाणापासून तयार होणारा तांदूळ हा औषधी असून मधुमेही, हृदयरोग या रुग्णांना फायदेशीर आहे. त्यामुळे त्याला 400 ते 500 रुपये दर मिळण्याची शक्यता आहे. या प्रायोगिक तत्वावर लागवड केलेल्या पिकांमधून अपेक्षेपेक्षा चांगले उत्पन्न उत्पादन मिळते. भातपिकानंतर पाण्याचा योग्य तो वापर करुन कडधान्य पीक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.