घरातली कीटकांची संख्या नियंत्रित ठेवण्यात पालींची भूमिका महत्त्वाची असते. मात्र पालींचा आपल्याला प्रचंड त्रास होतो. पाल दिसली तरी आपण प्रचंड घाबरून जातो. पण तसा विचार केला तर पाल सहसा कोणालाच काहीच हानी पोचवत नाही. ‘पाल’ या प्राण्याबद्दल विशेष तिरस्कार निर्माण होण्यामागे जी काही कारणं किंवा गैरसमज आहेत त्यापैकी एक म्हणजे पाल विषारी असते. ती अन्नात पडल्याने विषबाधा होते.
पण घरगुती पालीच्या जबड्यात विष नाही आणि त्वचेतही नाही. त्यामुळे ती निश्चितच विषारी नाही. मग पाल अन्नात पडल्याने विषबाधा कशी होते? याचं उत्तर आहे तिच्या आतड्यात असणार्या ‘सालमोनेला’ या प्रकारचे दंडगोलाकार बॅक्टेरिया. या जगात माणसासकट जवळपास प्रत्येक जीवाच्या शरीरात कुठल्या ना कुठल्या प्रकारचे परजीवी राहात असतात. ते त्यांच्या ‘होस्ट’ साठी तारक तर कधी मारक असतात. त्यामुळे पालीतील हे सालमोनेला विषकारी असते.
त्यामुळे पाल ही संपूर्णता विषारी नाही. जीवाच्या भितीने कुठलाही सजीव अनेकदा घाबरून ‘डेफिकेट’ म्हणजे मलमूत्र विसर्जन करतो. पाल जेव्हा उकळत्या अन्नात पडते, तेव्हा ती घाबरून ‘डेफिकेट’ म्हणजे शी करते आणि त्यामार्गाने बॅक्टेरिया अन्नात पसरतात ज्यामुळे अन्नात विषबाधा होते. पाल विषारी नसून तिच्या शरिरातील बॅक्टेरियांमुळे अन्नात विषबाधा होते. पालीला इंग्लिश मध्ये लिझार्ड म्हटले जाते आणि ऐकून नवल वाटेल पण जगात ५६०० विविध जातीच्या पाली आहेत. पालीला जेव्हा धोक्याची जाणीव होते तेव्हा शेपटी वेगळी करण्याची अनोखी देणगी तिच्या कामी येते. पाल मारण्याचा प्रयत्न करून पहा, प्रथम ती शेपटी वेगळी करते. हे शेपूट वळवळत राहिल्याने आपले पालीकडचे लक्ष आपोआप कमी होते आणि तेवढा वेळ पालीला तिची सुटका करून घेण्यास पुरेसा होतो. विशेष म्हणजे ही तुटलेली शेपटी काही दिवसात पुन्हा येते.
घरातून पाल घालवण्यासाठी उपाय
थंड जागी पाल राहत नाही. पालीला उष्ण जागेवरती राहण्यास आवडते. त्यामुळे पाल ही शक्यतो आपणास उष्ण जागेवरच दिसते. कॉम्प्युटरच्या मागे, ट्यूब लाईट जवळ जेथून उष्णता निर्माण होते अशा जागी आपणास पाल दिसते. तुम्ही जर एक निरीक्षण केले तर तुमच्या लक्षात येते की पाल पाऊसाळ्यात जास्त दिसत नाही. कारण बाहेरील वातावरण थंड असते. त्यामुळे पाल आपणास दिसत नाही. जर तुमच्या घरात खूपच पाली झाल्या असतील तर तुम्ही तुमच्या घरात जर एसी असेल तर तो लावा. त्यामुळे ऑफिसमध्ये, दवाखान्यात एसी लावला तर पाल तुम्हाला दिसणार नाही.
नेफ़थलीन किंवा डांबर गोळी
हा देखील पालेवर एक चांगला उपाय ठरू शकतो. नेफ़थलीनच्या वासाने पाली फार कमी होतात. तुम्ही जर घरातील सर्व अडचणीच्या जागेवर डांबर गोळ्या पसरून ठेवल्या तर पाली तुम्हाला दिसणार नाही. त्यामुळे जर तुम्ही घरात डांबर गोळ्या पसरून ठेऊ शकता. नेफ्थलीनच्या गोळ्या वार्डरोब, वॉश बेसिन व इतर कोपर्यांमध्ये ठेवाव्या अश्या ठिकाणी पाल येणार नाही. ज्या लोकांना पालीची सर्वात जास्त भीती वाटते, त्या सर्वांसाठी हा उपाय अतिशय उपयुक्त आहे.
अंड्याचे कवच
पाली घालवण्यासाठी तुम्ही तुमच्या घरातील अंड्याचे टरफल वापरू शकतात. अंड्याचे टरफल ठेवले तर घरातील पाली निघून जातील. अंड्याचे टरफल ठेवले तर पाली त्याला घाबरून पळून जातील. त्यांना वाटेत असते की, समोर एखादा शत्रूच आहे.
मोरांचे पंख
पाली मोरपंखाला घाबरतात. मोरपंख बघून त्यांना जवळपास साप असल्याचा भ्रम होतो म्हणून त्या पळतात. घरात प्रत्येक खोलीत मोरपंख ठेवा. पाली पुन्हा फिरणार देखील नाहीत.
कांदा कापून ठेवा
कांदा कापून लाइटजवळ लटकवा. याच्या तीक्ष्ण गंधामुळे पाली पळतात. पाणी आणि मिरपूड मिसळून मिश्रण तयार करा. हे मिश्रण किचन, बाथरूम, सिंक, व घरातील कोपर्यामध्ये शिंपडा. या तीक्ष्ण वासामुळे पाली पळतात.
लसूण पाकळ्या
लसणाच्या पाकळ्या ठेवल्याने पण पाली पळतात. तसेच कांदा आणि लसणाचा स्प्रे तयार करून कोपर्यात शिंपडू शकतात.
कॉफी पावडर आणि तंबाखू
कॉफी पावडर आणि तंबाखू सोबत मिसळा आणि लहान लहान गोळे बनवून पाल जिथे येते तिथे ठेवा. हे मिश्रण पालीने खाल्ले तर तिचा मृत्यू होईल, अथवा पाल लांबपर्यंत पळ काढेल.
कॉफी पावडर आणि तंबाखू सोबत मिसळा आणि लहान लहान गोळे बनवून पाल जिथे येते तिथे ठेवा. हे मिश्रण पालीने खाल्ले तर तिचा मृत्यू होईल, अथवा पाल लांबपर्यंत पळ काढेल.