( रत्नागिरी / प्रतिनिधी )
पाली येथे मोबाईलचे दुकान फोडून २ लाख ३६ हजार ७४० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना १९ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर दरम्यान घडली. याबाबतची फिर्याद कल्पेश खोचाडे (३०, साठरेबांबर, खाचाडेवाडी) यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकात दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्पेश खोचाडे यांचे पाली बाजारपेठेत रेडजाई मोबाईलचे दुकान आहे. ते मंगळवार १९ ऑक्टोबर रोजी दुकान बंद करुन घरी गेले होते. मात्र २० ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० वा. च्या सुमारास आले असता दुकान फोडल्याचे दिसून आले. गाळयाला असलेली लोखंडी शटर उचकटून चोरटयाने दुकानात प्रवेश केला. दुकानातील २ लाख १६ हजार रुपये किंमतीचे रेडमी, व्हिवो, सॅमसंग, आयटेल, लाव्हा, नोकिया कंपनीचे ३७ मोबाईल अज्ञाताने चोरुन नेले. तसेच १७ हजार रुपये किंमतीची ८ हातातील घडयाळे, ३२०० रुपये किंमतीचा रियलमी कंपनीचा इयरबर्डस असा एकूण 2 लाख ३६ हजार ७४० रुपयांचा मुद्देमाल अज्ञाताने चोरून नेला. खोचरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञातावर भादविकलम ४५४, ४५७. ३८० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरटा सीसीटिव्ही मध्ये कैद झाला आहे. पोलिस त्यादिशेने तपास करत आहे.
घटनास्थळी श्वानपथक पथकाने सेवा रस्त्याचे वर 100 मिटर पर्यंत वरील बाजूस माग काढला .
शटर कुलुपे न तोडता मध्यभागी वर उचकटून अवघ्या काही अंतरातून आत प्रवेश करून अत्यंत चलाखीने चोरी केली. वरील मजल्यावर व बाजूला घरे व दुकानासमोर रात्री उशिरापर्यंत महामार्गाचे काम सुरू असूनही अचूक वेळ साधून धाडसी चोरी
लगतच्या ज्वेलरी दुकानाच्या Cctv चोरटा जाताना व येताना दिसत आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर सूर्य, पाली पोलीस दुरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मोहन कांबळे, हेडकॉन्स्टेबल संतोष कांबळे, पोलिस नाईक राकेश तटकरी यांनी भेट देऊन पंचनामा केला.