(रत्नागिरी / प्रतिनिधी)
तालुक्यातील पाली येथे प्रौढाने मद्याच्या नशेत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आल़ी. कुमार बबन नाथगोसावी (वय 55, रा. पाली बाजारपेठ, रत्नागिरी) असे मृत प्रौढाचे नाव आहे. या घटनेची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत करण्यात आली आह़े.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाथगोसावी यांना मद्याचे व्यसन होते. मद्याच्या नशेत 2 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास घराच्या शेजारील आंब्याच्या झाडाला नायलॉनची दोरी बांधून त्यांनी गळफास घेतला. या प्रकरणी नातेवाईकांनी पाली दुरक्षेत्रात खबर दिली. पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात आणला. अधिक तपास ग्रामीण पोलिसांकडून करण्यात येत आह़े.