(रत्नागिरी/प्रतिनिधी)
आगामी काळात ओबीसी आरक्षण विना होणार्या निवडणुकीत हातखंबा पाली जिल्हा परिषद गटातून ओबीसी समाजाचा अनुभवी प्रतिनिधी म्हणून निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची मागणी असल्यानेच मी पूर्ण ताकदीने निवडणूक लढवणार असल्याचे माजी जि. प. सदस्य व रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक रामचंद्र गराटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
पाली जिल्हा परिषद गटाचे यापूर्वी आपण दोनदा प्रतिनिधीत्व केलेले आहे. त्यामुळे येथील गटाच्या समस्या, अडचणी व विकासाच्या दृष्टीने आवश्यक विकासकामांची आपणास माहिती असल्याने आपण आता निवडणूक लढविणार आहोत. तसेच सध्या ओबीसी आरक्षण लागू नसल्याने या प्रवर्गातून माझ्यासारख्या जेष्ठ लोकप्रतिनिधीला संधी देण्याची मागणी आता अनेक कार्यकर्ते करीत आहेत. त्यामुळे मी आता आता पाली जि.प.गटातून निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे, असे रामचंद्र गराटे यांनी बोलताना सांगितले.