(रत्नागिरी)
तालुक्यातील पाली-पाथरट गावांचे ग्रामदैवत श्री लक्ष्मीपल्लीनाथ व श्री करंबेळदेव मंदिराच्या जीर्णोध्दाराचा व कलशारोहणचा 13 वा वर्धापनदिन कार्यक्रम दि.३० एप्रिल व १ मे रोजी पाली येथे मंदिरात आयोजित करण्यात आले आहेत. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
आज शनिवार दि. ३० एप्रिल रोजी श्री लक्ष्मीपल्लीनाथ मंदिरात स.९ ते १२ वा. श्रींवर लघुरूद्र अभिषेक, दु.१२ ते १२.३० वा. नैवेद्य, आरती, १२.३० ते १.३० वा.पर्यंत मंदिरासभोवती ढोलताशांच्या गजरात भोवत्या व १.३० ते ३ वा.पर्यंत महाप्रसाद व रात्री ९ ते १०.३० स्थानिक भजन असा कार्यक्रम होणार आहे.रविवार,दि.१ मे रोजी श्री करंबेळदेव मंदिरात स.९ ते १२ वा. श्रींवर लघुरूद्र अभिषेक, दु.१२ ते १२.३० वा. नैवेद्य, आरती, १२.३० ते १.३० वा. मंदिराभोवती ढोलताशांच्या गजरात प्रदक्षिणा, १.३० ते ३ वा. महाप्रसाद व रात्री 9.30 वा. श्री लक्ष्मीपल्लीनाथ रंगमंचावर श्री समर्थ कृपा प्रॉडक्शन, रत्नागिरी निर्मित कोकणचा साज संगमेश्वरी बाज हा विनोदी प्रयोग होणार आहे.
तरी उत्सव काळातील सर्व धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन श्री लक्ष्मीपल्लीनाथ देवस्थानचे मुख्य मानकरी व अध्यक्ष संतोष नारायण सावंतदेसाई यांनी केले आहे.