(संगमेश्वर / विवेक शेट्ये)
बालवयापासून लागलेले वळण आणि शिस्त पुढे जीवनभर कायम राहते. यामुळे लहानपणी घरून संस्कार आणि शाळेत शिस्त शिकवणे फार आवश्यक आहे. हीच बाब वाहतुक नियमांसंधर्भातही लागू होते. शासकीय पातळीवरून होणाऱ्या विविध उपाययोजनानंतरही दिवसागणिक रस्त्यावरील अपघातांची संख्याही वाढतच आहे. या समस्येवर उपाय म्हणून मुलांना शालेय जीवनातच वाहतूक नियमांचे धडे देण्यावर भर दिला जाऊ लागला आहे. पण व्यवहारिक विचार केल्यास मुलांपेक्षा पालकांनाच वाहतूक नियमांचे प्रशिक्षण देणे अधिक म्हत्वाचे ठरेल.
शहरातच बघितले तरी तरुण असोत किंव्हा मध्यमवयीन तर केव्हा केव्हा वृद्ध वाहनचालकही सर्रासपणे वाहतूक नियमांचे उल्लंघन करताना दिसतात. विनाहेल्मेट दुचाकी चालवणे नियमबाह्य आहेच शिवाय ते धाडस धोक्याचे ठरू शकते. याची पुरेपूर जाणीव असूनही शहराच्या ठिकाणी अनेक दुचाकीचालक विनाहेल्मेट दुचाकी चालवताना सर्रासपणे दिसून येतात. यावरून असे लक्षात येते कि, वाहतुक पोलिसांचा कारवाईचा धाकच त्यांच्या मनात शिल्लक नाही. मुले सोबत असूनही पालकांकडून वाहतूक नियमांची पायमल्ली केली जाते.पालकच जेंव्हा वाहतूक नियम मोडत असतील तर मुले तरी नियमांचे पालन कसे करतील याचा विचार करून तरी पालकांनी वाहनचालविताना नियमांचे पालन करणे अतिशय महत्त्वाचे आहे.
ट्रॅफिक सेन्स’च नाही बहुतांश वाहांचालकांमध्ये ‘ट्रॅफिक सेन्स’चा अभाव दिसतो. चौकात सिंगनल रेड झाल्यावर वाहनचालक आपली वाहने पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी असलेल्या झेब्रा क्रॉसिंगच्या उभी करतात. तर पादचारी देखील झेब्रा क्रॉसिंगचा अवलंब टाळून मिळेल तेथून रस्ता ओलांडतात तर बहुतेकदा रस्त्याच्या मधोमध चालणाऱ्या वाहनसमोरूनही मार्ग काढताना दिसतात. रुंद रस्त्यावर कोणत्या लेनने वाहन चालवायचे याचेही भान राहत नाही अशावेळीही अपघाताच्या घटना घडत असतात. चौकाचौकात रेड सिंगनल लागताच उजव्या दिशेने जायचे असले तरी वाहनचालक आपली वाहने डाव्या बाजूला उभी करतात. आणि सिग्नल सुरू होताच सर्वच वाहनांना त्याचा त्रास होतो. निघण्याच्या घाईत अनेक वाहनचालक उजवे-डावे इंडिकेटर न दाखवता पटकन लेन बदलताना दिसतात, शावेळेही अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
इंडिकेटर ठरले निरर्थक
शहरात रात्रीच्या वेळी वाहने चालवणाऱ्या अनेक नागरिकांना इंडिकेटर वापरण्याचा अर्थही माहीत नाही.एजंट मार्फत आरटीओ मधून वाहन चालविण्याचा परवाना मिळवणारे स्वतःलाच तज्ञ वाहनचालक समजू लागतात. अतिवेगाने वाहन चालवणे, ओव्हरटेक करणे,मद्यपी करून वाहन चालवणे, सिग्नल तोडून वाहन चालवणे हो बाब नित्याचीच झाली आहे. सिग्नल ग्रीन होताच समोरच्या वाहनांची एक सेकंदही वाट पाहणे मागे उभे असलेल्या अनेक वाहनचालकांना असह्य होते.आणि कानठळ्या बसणाऱ्या कर्कश हॉर्न वाजू लागतात.
वाहन चालक वाहन चालवताना मोबाईलवर बोलत असल्याने त्यांच्या मागे किंव्हा बाजूला बसलेले प्रवाशी घाबरतात. शहरात मुलांना वाहतुक नियम शिकवण्याची तरतूद असलीच पाहिजे. पण त्या पूर्वी त्यांच्या पालकांसाठी प्रशिक्षणाची तरतूद करणे अत्यावश्यक असल्याचे बोलले जात आहे.