(रत्नागिरी)
रत्नागिरी तालुक्यातील करबुडे गावाच्या विकासकामांसाठी पालकमंत्री ना.उदयजी सामंत यांच्या माध्यमातून ३ कोटीं ५० लाखाच्या निधी देण्यात आला असुन पालकमंत्री ना.उदयजी सामंत यांच्या उपस्थितीत येथील कामांचे भूमिपूजन संपन्न झाले. गावाच्या विकासासाठी पालकमंत्री म्हणून मी कटीबद्ध असल्याचा शब्द पालकमंत्री यांनी गावकऱ्याना दिला. गावात रस्ता, पाणी, विविध विकासकामासाठी लागेल तेवढा निधी पालकमंत्री या नात्याने करबुड्याला देण्याचा शब्द यावेळी त्यांनी दिला.
करबुडे गावाच्या विकासकामासाठी निधी कमी पडू देणार नसून आठ दिवसात १ कोटीच्या कामाची नावे द्या तेही करबुडेसाठी देणार असल्याचे पालकमंत्री ना.उदयजी सामंत यांनी जाहीर केले. यावेळी पूर्ण गावं ना.उदयजी सामंत यांच्या मागे उभे राहणार असल्याचा शब्द गावकरी मंडळीनी पालकमंत्री यांना दिला आहे.
यावेळी कार्यक्रमाला जिल्हा प्रमुख राहुल पंडित, तालूका प्रमुख बाबू म्हाप, शंकर सोनवडकर, मिलिंद देसाई, प्रवीण पांचाळ, हरिश्चंद्र बंडबे, गावातील गावकर जानू तांबे, वैभव कलंबटे,अंनत कारकर, दिनेश वेद्रे, विलास वेद्रे, सखाराम आग्रे, रवींद्र तांबे, नंदुकुमार पाचकुडे, सुनील खापरे, प्रकाश जाधव, प्रवीण धनावडे, सरपंच संस्कृती पाचकुडे, उपसरपंच करिष्मा गोताड, ग्रामपंचायत सदस्य विशाल जाधव, अभिषेक धनावडे, रुंजी शितप, नेहा रामगडे, वसंत पाचकुडे, चंद्रकांत जाधव, दीपिका वेद्रे, शामल खापरे, लक्ष्मण गावडे, समृद्धी साळवी, ममता कळबटे, मंगेश सोनवडकर यांच्या सहित गावातील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.