(देवरूख / प्रतिनिधी)
देवरूख-साडवली येथील जुन्या काळातील लाकुड व्यापारी व शेतकरी पार्श्वनाथ धोंडिराम वणकुंद्रे यांचे रविवार दि.25 रोजी अल्पशा आजाराने वयाच्या 76व्या वर्षी दुखद निधन झाले.
गेली अनेक वर्षे पारंपारिक शेती करत असताना त्यांनी आपल्या पत्नी (बारकूआक्का) यांचेसह अनेक कष्टाचे जोड व्यवसाय करत त्या खडतर काळात लाकुड व चिवाकाठी व्यवसाय सुरू केला. त्यावेळी गावागावात रस्ते नसतानाही जंगलतोड केलेले लाकूड बैलगाडीतून वाहतूक करत असत. जंगलतोड झालेवर जमीन मालक त्या जागेवर लागवड करतोय की नाही हे कटाक्षाने पाहून त्याला झाडे लागवडीसाठी मदत करीत असत. यासर्व कामात आपला घर-संसार सांभाळून त्यांना पत्नीची कायम साथ मिळायची. देवरूखात कामानिमित्त आलेल्या शेतकरी बांधवांच्या अडीनडीला हे दापत्य नेहमीच मदतीचा हात देत असे व सर्वांच्या सुख दुःखात सहभागी व्हायचे. त्यामुळे त्याचा जनसंपर्कही चांगला होता. त्यांच्या या संपर्कामुळे त्यांची सुन देवरूखची नगरसेविका म्हणून निवडून आली होती. हाच जनसेवेचा वसा त्याची मुल व सुना पुढे चालवत आहेत.
रविवारी वृद्धापकाळाने निधन झालेचे समजतात अनेकांनी शोक व्यक्त करत त्याचे अंत्यदर्शनासाठी धाव घेतली. त्याचे पश्चात पत्नी. ३ मुलगे. मुली नातवंड असा परिवार आहे. त्यांचेवर चर्मालय स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.