(शीर /गुहागर)
शरदचंद्रजी पवार उद्यानविद्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून जि.प. आदर्श केंद्र शाळा शीर क्र.एक येथे रानभाज्या प्रदर्शन व पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळेस गावकरी आणि विशेषतः महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. प्रदर्शनासाठी विद्यार्थ्यांनी बऱ्याच प्रकारच्या रानभाज्या, त्यांची छायाचित्रे व माहिती प्रदर्शित केली होती.
रानभाज्या पाककला स्पर्धेसाठी गावातील महिला बचत गटांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला. स्पर्धेत 20 महिला बचत गटातील महिलांनी रानभाज्यांपासून 35 वेगवेगळे पदार्थ बनवून आणले होते. विद्यार्थ्यांनी स्पर्धेत बक्षीस म्हणून फुलझाडांचे वितरण केले व प्रत्येक सहभागी महिला बचत गटाला दालचिनीची रोपे भेट म्हणून दिली.
सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शीर ग्रामचे सरपंच विजय धोपट, उपसरपंच अमित साळवी, ग्रामविकास अधिकारी मच्छिंद्र देवकाते, माजी तालुका उपसभापती सिताराम ठोंबरे, शाळा समिती अध्यक्षा पूर्वजा गुरव, उपाध्यक्ष अजय पाटील, ग्रामपंचायत सदस्या संजना मोरे आदी उपस्थित होते. सदर उपक्रम ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत विद्यार्थ्यांकडून पार पडला.
रानभाज्या का खाव्यात, त्यांचे महत्त्व काय आहे हे ह्या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. सदर गटात कु. सतेज नेवगी, कु वैभव नागले, कु. शंतनु लिमये, कु अभिषेक निर्मळ, कु. निशांत फडतरे आदी विद्यार्थी आहेत. या उपक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनितकुमार पाटील व प्राध्यापक मिथुन पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले