(रत्नागिरी)
रत्नागिरी तालुक्यातील पानवल फाटा येथे बुधवारी दुपारी कुरियर टेम्पोचालक सिध्देश निलकंठ निमकर (रा.बहादूरशेख नाका, चिपळूण) हा आपल्या ताब्यातील टेम्पो (एमएच- 12-टीव्ही- 5186) घेऊन हातखंबा ते रत्नागिरी असा येत होता. तो पानवल फाटा येथे आला असता आपल्या ताब्यातील टेम्पाचे चाक साईपट्टीखाली गेल्याने टेम्पा वर घेत होता. त्याच दरम्यान शुभम पालये आपल्या ताब्यातील अॅक्टिव्हा दुचाकी (एमएच- 08-ए- 2762) वरुन ॠतिक कुडतरकरला सोबत घेउन रत्नागिरी ते कापडगाव असा जात असताना मागे येणार्या टेम्पोची धडक त्यांच्या दुचाकीला बसल्याने ते दोघेही रस्त्याच्या बाजुला असलेल्या कठड्यावर जाऊन आपटले. यात शुभमच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी झालेला असून त्याच्यावर जिल्हा शासकिय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बुधवार 24 मे रोजी दुपारी 3.30 वा. सदर घटना घडली.
शुभम सुनिल पालये (28) व ॠतिक संजय कुडतडकर हे दोन्ही रा.कापडगाव, रत्नागिरी येथे राहणारे आहेत. सायंकाळी उशिरा या अपघाताची नोंद ग्रामीण पोलिस ठाण्यात करण्याची कार्यवाही करण्यात आली. या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पानवल फाटा येथे बुधवारी दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. याबाबत अधिक तपास पोलीस करीत आहेत.