(संगमेश्वर)
देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्रीम. अरुंधती अरुण पाध्ये इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स, देवरुख येथे विद्यार्थ्यांच्या वार्षिक आर्ट अँड क्राफ्ट प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील या प्रदर्शनाचे उद्घाटन स्टेट बँक ऑफ इंडिया, देवरूखचे शाखा व्यवस्थापक सौरभ सागजकर यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी पाध्ये स्कूल कमिटीचे चेअरमन राजेंद्र राजवाडे, मुख्याध्यापिका सोनाली नारकर व दीक्षा खंडागळे, कलाशिक्षक सुरज मोहिते, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि बहुसंख्य विद्यार्थी याप्रसंगी उपस्थित होते.
या वार्षिक आर्ट अँड क्राफ्ट प्रदर्शनामध्ये प्रशालेतील ३४५ विद्यार्थ्यांच्या ६४० कलाकृती प्रदर्शित करण्यात आल्या आहे. यामध्ये विविध शैलीतील चित्रे, कोलाज, स्केचेस, मूर्तिकाम, ओरिगामी कला, लाकडी वस्तू, टाकाऊ वस्तुपासून बनवलेल्या टिकाऊ आकर्षक वस्तू मांडण्यात आल्या आहेत. प्रदर्शनात मांडलेल्या सर्व कलाकृती बनवण्यासाठी कलाशिक्षक सुरज मोहिते यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
प्रशालेने आयोजित केलेल्या आर्ट अँड क्राफ्ट प्रदर्शनात सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे व कलाशिक्षक सुरज मोहिते यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक, ॲड. वेदा प्रभुदेसाई आणि राजेंद्र राजवाडे यांनी कौतुक केले.